Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीPhd Exam : विद्यार्थ्यांसाठी आनंदवार्ता! आता घरबसल्या देता येणार 'पेट' परीक्षा

Phd Exam : विद्यार्थ्यांसाठी आनंदवार्ता! आता घरबसल्या देता येणार ‘पेट’ परीक्षा

‘या’ तारखेपर्यंत अर्ज करता येणार

सोलापूर : विद्यापीठ प्रशासनाने पीएच.डी. पूर्व ‘पेट’ परीक्षा (Phd Exam) देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची माहिती दिली आहे. सोलापूर (Solapur) येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाने (Punyashlok Ahilyadevi Holkar University) यंदा प्रथमच ऑनलाइन पद्धतीने पेट परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशासह परदेशातील कोणत्याही विद्यार्थ्याला आता घरबसल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची ‘पेट’ देता येणार आहे. (Online Exam)

१३ जूनपासून अर्ज करण्याची सुरुवात

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात यावेळी ‘पीएच.डी.’ च्या जवळपास ४७४ जागा असणार आहेत. ‘पीएच.डी’ पूर्वीची पेट देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उद्यापासून ६ जुलैपर्यंत अर्ज करण्याची लिंक खुली असणार आहे. विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून अर्ज करता येतील.

विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, पेट परीक्षेत दोन पेपर असतात. त्यामध्ये सकाळी रिसर्चचा पेपर तर दुसरा संबंधित विषयाचा पेपर दुपारच्या सत्रात होणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांना घरी बसून त्यांच्या अ‍ॅन्ड्राईड मोबाईल, संगणक किंवा लॅपटॉपवरूनही देता येणार आहे. मात्र कॅमेऱ्यासमोरून दोनदा विद्यार्थी हलला किंवा बाजूला झाला तर तो बाद ठरविला जाणार असल्याचेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. हा पेपर सोडविण्याची प्रत्येकी एक तासाचा वेळ असणार आहे. तर १८ ते २० जुलै दरम्यान विद्यार्थ्यांची मॉक टेस्ट घेण्यात येणार असल्याचे, विद्यापीठाने सांगितले आहे.

दरम्यान, एका विषयातून पेट देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २१ जुलैला परीक्षा देता येणार आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांना एकापेक्षा अधिक विषयातून पेट द्यायची आहे, त्यांची परीक्षा २२ जुलैला होणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -