Thursday, July 4, 2024
HomeदेशParliamentary session : 'या' तारखेपासून सुरु होणार संसदीय अधिवेशन!

Parliamentary session : ‘या’ तारखेपासून सुरु होणार संसदीय अधिवेशन!

नवी दिल्ली : देशात लोकसभा निवडणुका (Loksabha Election 2024) पार पडल्या असून निकालही लागले आहेत. यानंतर एनडीएकडून नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पंतप्रधान पदाची निवड झाली असून त्यांनी पदभार स्वीकारत कामे मार्गी लावण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता संसदीय अधिवेशन (Parliamentary session) होणार असून त्याच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अठराव्‍या लोकसभेचे पहिले अधिवेशन २४ जून ते ३ जुलै या कालावधीत होणार आहे. या कालावधीत नूतन खासदारांची शपथ, लोकसभा अध्‍यक्षांची निवड, राष्ट्रपतींचे अभिभाषण होईल, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी दिली आहे. १८ व्‍या लोकसभेत सत्ताधारी भाजपाच्या (BJP) नेतृत्वाखालील एनडीएचे (NDA) २९३ खासदार आहेत तर विरोधी पक्ष इंडिया आघाडीचे २४० खासदार आहेत.

‘या’ तारखेपासून राज्यसभेचे अधिवेशन सुरु होणार

लोकसभेचे विशेष अधिवेशन २४ जूनपासून होणार आहे तर राज्यसभेचे २७ जूनपासून सुरू होणार आहे. नऊ दिवसांच्या विशेष अधिवेशनादरम्यान, लोकसभेच्या अध्यक्षांची निवड केली जाईल आणि नवीन संसद सदस्य (एमपी) त्यांची शपथ घेतील. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अध्यक्ष द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) सभागृहाला संबोधित करतील.

दरम्यान, लोकसभा अध्यक्षपद हे एनडीएतील घटक पक्षांकडे जाणार असल्याची सध्या चर्चा सुरु आहे. यामध्ये टीडीपी किंवा जेडीयू या पक्षांच्या खासदाराकडे लोकसभा अध्यक्षपद जाईल अशी देखील चर्चा सुरू आहे. तसेच लोकसभा अध्यक्षपदासाठी भाजपाच्या खासदार डी. पुरंदेश्वरी यांच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -