मुंबई: भारतात व्हेज खाण्यासोबतच नॉनव्हेज खाणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. काही लोक तर बारा महिने नॉनव्हेजचे सेवन करत असतात.
नुकताच भारत सरकारकडून एक प्रकारचा सर्व्हे करण्यात आला. यात मटण, अंडी आणि मच्छीच्या मासिक विक्रीबाबत माहिती देण्यात आली. सर्व्हेनुसार नागालँडमधील लोक नॉनव्हेजवर सर्वाधिक खर्च करतात.
येथे महिन्याला १४.८५ टक्के भाग मटण खरेदीसाठी वापरला जातो. दुसऱ्या स्थानावर लक्षद्वीप आहे. येथे १२.६ टक्के लोक नॉनव्हेजवर खर्च करतात.
नॉनव्हेज खाण्याच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर मणिपूर आहे. येथे महिन्याच्या खर्चापैकी ११.९३ टक्के भाग नॉनव्हेजवर खर्च केला जातो. तर हरयाणामधील लोक नॉनव्हेजवर सर्वात कमी खर्च करतात.