Thursday, January 15, 2026

Nana Patole : वारंवार फोन करूनही उद्धव ठाकरे फोन घेत नाहीत

Nana Patole : वारंवार फोन करूनही उद्धव ठाकरे फोन घेत नाहीत

मुंबई : वारंवार फोन करूनही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे फोन घेत नाहीत, असा संताप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी काल जाहीर व्यक्त केला. यावरून महाविकास आघाडीतील (MahaVikas Aghadi) नेत्यांमध्ये आलबेल नसल्याची चर्चा रंगली आहे.

नाना पटोले म्हणाले की, "ज्यावेळी उद्धव ठाकरे लंडनमध्ये गेले, तेव्हा फोनवरून संवाद झाला. विधान परिषदेच्या दोन जागा तुम्ही लढा आणि दोन जागा आम्ही लढतो असे मी त्यांनी सांगितले. त्यांनी मला तुमचे उमेदवार कोण? असे विचारले. त्यावर मी उमेदवारांची नावे सांगितली. नाशिकमधल्या काँग्रेस उमेदवाराला ठाकरेंनी बोलावून घेतले आणि स्वपक्षातून उमेदवारी जाहीर केली. महाविकास आघाडीत चर्चा करून निर्णय घेतला असता, तर या चारही जागा जिंकणे सोपे झाले असते. ठाकरेंनी चारही जागा घोषित केल्यानंतर मी वारंवार त्यांना फोन लावला. पण त्यांचे ऑपरेटर 'साहेब तयार होत आहेत', असा निरोप देत होते. शेवटी त्यांच्याशी फोनवर संपर्क झालाच नाही. त्यांच्या मनात नेमके काय आहे, हे प्रत्यक्ष भेटल्यावर कळेल," असेही पटोले म्हणाले.

Comments
Add Comment