मुंबई: अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्या यजमापदाखाली खेळवल्या जात असलेल्या टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये आज भारतीय संघाचा सामना यूएसएशी खेळवला जात आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होणार आहे. न्यूयॉर्कच्या नसाऊ काऊंटी स्टेडियममध्ये हा सामना रंगणार आहे.
या सामन्यात जो संघ विजयी होईल तो संघ सुपर ८ साठी क्वालिफाय करेल. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ विजयासाठी अधिक दावेदार मानला जात आहे. दुसरीकडे कठीण परिस्थितीत असलेला पाकिस्तानचा संघही भारताच्या विजयासाठी प्रार्थना करेल.
पाकिस्तानला जर सुपर ८ साठी क्वालिफाय करायचे असेल तर त्याला शेवटचा सामना जिंकणे गरजेचे आहे. सोबतच यूएसएनेही त्यांचे दोन सामने गमवावेत अशी प्रार्थना करावी लागेल. सध्या ग्रुप एमध्ये भारतीय संघ आणि यूएसएचे २-२ अंक आहेत. भारत अव्वल स्थानावर आहे.
अमेरिकाला कमकुवत समजणे चूक ठरेल
भारतीय संघाची टॉप ऑर्डर अमेरिकेविरुद्ध चांगली कामगिरी करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. अमेरिकेच्या संघाकडे जरी अनुभव नसला तरी गेल्या २ सामन्यांत त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांना कमी लेखून चालणार नाही.
संघ
भारतीय संघ – रोहित शर्मा(कर्णधार), हार्दिक पांड्या, यशस्वी जायसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
अमेरिकेचा संघ – मोनांक पटेल(कर्णधार), आरोन जोन्स, अँड्रीज गौस, कोरी अँडरसन, अली खान, हरमीत सिंह, जेसी सिंह, मिलिंद कुमार, निसर्ग पटेल, नितीश कुमार, नोशतुश केंजीगे, सौरभ नेत्रावलकर, शॅडली वान शल्कविक, स्टीव्हन टेलर आणि शायन जहांगीर