न्यूयॉर्क: अर्शदीप सिंह याने घेतलेल्या चार बळींच्या जोरावर भारताला यूएसएकडून १११ धावांचे आव्हान मिळाले आहे. भारताने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेत यूएसएला फलंदाजीस बोलावले. कर्णधाराचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सार्थ ठरवला.
अर्शदीप सिंहने चार विकेट घेत यूएसएच्या डावाला खिंडार पाडले. त्याने गोलंदाजीत जबरदस्त कामगिरी करताना यूएसएच्या फलंदाजांना सळो की पळो करून टाकले. अखेर यूएसएने २० षटकांत ८ बाद ११० धावा केल्या. भारताला विजयासाठी १११ धावांची आवश्यकता आहे.
यूएसएचा सलामीवीर स्टीव्हन टेलरच्या २४ धावा, नितीश कुमारच्या २७ धावा, कोरे अँडरसनच्या १५ धावा या व्यक्तिरिक्त इतर फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात यश मिळाले नाही. यूएसएचे एकामागोमाग एक फलंदाज बाद होत गेले.
भारताकडून अर्शदीप सिंहने ४ विकेट तर हार्दिक पांड्याने २ आणि अक्षर पटेलने एक विकेट घेतली.