Thursday, July 4, 2024
Homeदेशपाचव्या, सहाव्या वेतन आयोगातील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना ‘अच्छे दिन’

पाचव्या, सहाव्या वेतन आयोगातील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना ‘अच्छे दिन’

महागाईभत्त्यात ७ ते १२ टक्के वाढ जाहीर 

नवी दिल्ली : केंद्र सरकारने (Central government) सहावा वेतन आयोग मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाईभत्त्यात सात टक्के वाढ जाहीर केली आहे. हे असे कर्मचारी आहेत, जे सेंट्रल पब्लिक एंटरप्रायझेस म्हणजेच सीपीएसईमध्ये काम करतात आणि त्यांचे वेतन केंद्रीय महागाईभत्ता (सीडीए पॅटर्न) नुसार केले जाते. त्याचबरोबर पाचवा वेतन आयोग मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये १२% वाढ करण्यात आली आहे.

अंडर सेक्रेटरी सॅम्युअल हक यांच्या मते, कर्मचाऱ्यांना १ जुलै २०२१ पासून आतापर्यंत देण्यात येत असलेला महागाईभत्ता १८९% इतका आहे.

आता तो १८९% वरून १९६% एवढा होणार आहे. हे दर सीडीए कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लागू आहेत, ज्यांचे वेतन डीपीई (सार्वजनिक उपक्रम विभाग) कार्यालयाच्या मेमोरँडमनुसार बदलले गेले आहे.

महागाईभत्त्याची रक्कम राऊंड फिगरमध्ये घेतली जाईल. भारत सरकारच्या विभागांना विनंती आहे की, त्यांनी त्यांच्या स्तरावर आवश्यक कार्यवाहीसाठी हे केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या निदर्शनास आणून द्यावे, असे त्यांनी म्हटले आहे.

महागाईभत्ता १२ टक्क्यांनी वाढला

केंद्र सरकार आणि केंद्रीय स्वायत्त संस्थांच्या इतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महागाईभत्ता ३५६% वरून ३६८% पर्यंत वाढवण्यात आला आहे. हे असे कर्मचारी आहेत, जे पाचव्या केंद्रीय वेतन आयोगानुसार पूर्व-सुधारित वेतनश्रेणी/ग्रेड वेतनामध्ये आपला पगार घेत आहेत.

पाचवा वेतन आयोग असलेल्यांना लाभ

महागाईभत्ता एक्स्पर्ट हरिशंकर तिवारी म्हणाले की, या वाढीचा लाभ पाचव्या वेतन आयोगाअंतर्गत पगार मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिला जाईल, ज्यांनी मूळ वेतनात ५०% डीए विलीन करण्याचा लाभ घेतला नाही. या सीपीएसई कर्मचाऱ्यांना देय असलेला डीए सध्याच्या ४०६% वरून ४१८% टक्के करण्यात आला आहे. ही वाढ १ जुलै २०२१ पासून लागू होण्याची शक्यता आहे. हरिशंकर तिवारी यांच्या मते, केंद्र सरकारच्या अखत्यारीत अशा अनेक सीपीएसई आहेत, जिथे वेतनश्रेणी वेगळी आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -