Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीरेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यास मुदतवाढ

रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यास मुदतवाढ

नवी दिल्ली : भारत सरकारने रेशन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. शिधापत्रिकाधारकांनी त्यांचे शिधापत्रिका आधारकार्डशी लिंक न केल्यास त्यांना रेशनचा लाभ मिळणार नाही. यामुळे आधार लिंक करणे महत्वाचे आहे, यासाठी सरकारने मुदत दिली होती. दरम्यान, आता मुदतवाढीबाबत सरकारने निर्णय घेत केंद्राने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे.

अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, आता रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२४ आहे. यापूर्वी त्याची अंतिम मुदत ३० जून होती. यापूर्वीही सरकारने अनेकवेळा मुदत वाढवून दिली आहे. आता पुन्हा एकदा मुदत वाढ दिली आहे.

भारत सरकारने वन नेशन-वन रेशनची घोषणा केली. यासाठी सरकारने शिधापत्रिकाधारकांना त्यांचे शिधापत्रिका लवकरात लवकर आधारशी लिंक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. अनेकांकडे एकापेक्षा जास्त रेशन कार्ड आहेत, हे थांबवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. सरकार देशातील सर्व बीपीएल कुटुंबांना शिधापत्रिकेद्वारे स्वस्त धान्य पुरवते.

ऑनलाईन रेशन कार्ड आधार कार्ड लिंक करु शकता. पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या राज्याच्या अधिकृत सार्वजनिक वितरण प्रणालीच्या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल. आता येथे तुम्हाला आधार लिंकचा पर्याय निवडावा लागेल. यानंतर तुमचा रेशन कार्ड नंबर आणि आधार क्रमांक टाकावा लागेल. आता तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर त्यात भरा आणि सबमिट हा पर्याय निवडा. यानंतर, फोनवर मिळालेला ओटीपी यात भरा आणि पुन्हा एकदा सबमिट पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुमच्या मोबाईलवर आधार रेशनकार्डशी लिंक झाल्याचा एक मेसेज मिळेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -