Friday, June 28, 2024
Homeमहत्वाची बातमीDombivli MIDC : धक्कादायक! डोंबिवली कारखान्यात पुन्हा अग्नितांडव, परिसरात धुराचे लोट

Dombivli MIDC : धक्कादायक! डोंबिवली कारखान्यात पुन्हा अग्नितांडव, परिसरात धुराचे लोट

आगीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मुंबई : काही दिवसांपूर्वी डोंबिवलीमधील अमुदान कंपनीत झालेल्या स्फोटाच्या धक्क्यातून परिसरातील नागरिक सावरले नसताना अशातच आणखी एक दुर्घटना घडल्याचे समोर आले आह. डोंबिवली येथे अभिनव शाळेजवळ असलेल्या इंडो-अमाईन्स या कंपनीत आग लागल्याची माहिती मिळत आहे. आगीमुळे हवेत मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले असून स्फोटांचे मोठ्या आवाजामुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. कामगार, रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले जात आहे. मात्र स्फोटाचे सत्र सुरुच असल्यामुळे डोंबिवली शहर हादरले आहे. (Dombivali MIDC Fire)

नेमके काय घडले

आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास डोंबिवली एमआयडीसी (Dombivli MIDC) फेज २ मध्ये ही आग लागली. मागच्या वेळी स्फोट झालेल्या अमुदान कंपनीच्याच बाजूला असलेल्या इंडो-अमाईन्स कंपनीत ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळत आहे. निवासी भाग आणि केमिकल कंपन्या जवळ असल्यामुळे भीती व्यक्त केली जात आहे.

स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांनी या परिसरातील रस्ते बंद केले आहेत. ही एक केमिकल कंपनी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तसेच अग्निशमन दलाचे पाच ते सात बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही आग मोठी असून कारखान्यात सतत स्फोट होत आहेत, त्यामुळे अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

त्याचबरोबर या एमआयडीसी परिसरात एक शाळा देखील आहे. आग आणि स्फोटांची मालिका पाहून शाळेने सर्व विद्यार्थ्यांना घरी पाठवले आहे. त्यामुळे नागरिकांकडून काहीसा सुटकेचा निश्वास टाकला जात आहे.

दरम्यान, या कारखान्यात मजूर होते का याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र सकाळी कारखान्याच्या आसपास मजूस दिसले होते. त्यामुळे या स्फोटावेळी मजूर कारखान्यात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सरकारच्या कारभारावर नागरिकांचा प्रश्न

अमुदान कंपनी स्फोटामुळे डोंबिवली एमआयडीसीतील ३० कंपन्या बंद करण्यात आल्या आहेत. या कंपन्या अन्य भागात स्थलांतरित करण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात पुन्हा एकदा एमआयडीसीतील रासायनिक कंपनीत आग लागल्याने कंपनी मालक पुन्हा नागरिक, शासन, चौकशी यंत्रणांकडून लक्ष्य होऊ लागले आहेत. एमआयडीसीतील या सततच्या आगीच्या दुर्घटनांमुळे परिसरातील रहिवासी चिंताग्रस्त आहेत. तसेच प्रशासनाला जाग कधी येणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -