नवी दिल्ली: केंद्र सरकारने मंगळवारी ११ जूनला लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची भारतीय सैन्याच्या प्रमुखपदी घोषणा केली आहे. लेफ्टनंट उपेंद्र द्विवेदी याआधी वाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून कार्यरत आहे. त्यांचा कार्यकाळ ३० जूनपासून सुरू होईल.
विधानानुसार लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी ३० जूनला कार्यभार हाती घेतील. तर सध्याचे सेनाध्यक्ष मनोज सी पांडे त्याच दिवशी आपले पद सोडतील. १ जुलै १९६४मध्ये जन्मलेल्या द्विवेदी यांना डिसेंबर १९८४मध्ये सेनेच्या इन्फंट्रीमध्ये कमिशन मिळाले होते.
या पदांवर केले आहे काम
४० वर्षांपासून ते भारतीय सैन्यात विविध पदांवर कार्यरत आहेत. विविध कमांड, स्टाफ, अनुदेशात्मक आणि परदेशी नियुक्त्यांमध्ये त्यांनी काम केले आहे.
शिक्षण
उपेंद्र द्विवेदी यांनी रीवाच्या सैनिक स्कूलमध्ये सुरूवातीचे शिक्षण घेतले. यानंतर नॅशनल डिफेन्स कॉलेस आणि यूएस आर्मी वॉर कॉलेजमधून शिक्षण केले. त्यांनी डीएसएससी वेलिंग्टन आणि आर्मी वॉर कॉलेज महू येथूनही कोर्स केला आहे. द्विवेदी यांना यूएसएडब्लूसी, कार्लिस्ले, अमेरिकेतील प्रतिष्ठित एनडीसी समान पाठ्यक्रमात विशिष्ट फेलोने सन्मानित करण्यात आले आहे.