Chandrababu Naidu : चंद्राबाबू नायडूंचा आज शपथविधी

पंतप्रधान नरेंद्र मोदीही राहणार उपस्थित


विजयवाडा : आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांचे नवे सरकार आज स्थापन होत असून, ते मुख्यमंत्रीपदाची (Chief Ministership) शपथ घेणार आहेत. या संदर्भात नायडू यांनी विजयवाडा येथील ए कन्व्हेन्शन सेंटरमध्ये एनडीएच्या सर्व १६४ आमदारांसोबत बैठक घेतली. यावेळी नायडूंच्या मंत्रिमंडळात २५ मंत्री असतील. यात टीडीपीचे १९, जनसेनेचे ४ व भाजपाचे २ मंत्री असणार आहेत.


लोकसभा निवडणुकीसह झालेल्या १७५ विधानसभा जागांच्या आंध्र प्रदेश विधानसभेत टीडीपीसोबत असलेल्या एनडीएने एकतर्फी विजय मिळवला होता. या निवडणुकीत टीडीपीचे १३५ आमदार, अभिनेते पवन कल्याण यांच्या जनसेनेचे २१ आमदार व भाजपाचे ११ आमदार निवडून आले आहेत. बैठकीनंतर चंद्राबाबू नायडू म्हणाले की, भाजपा, जनसेना आणि टीडीपीच्या सर्व आमदारांनी एनडीए सरकारमध्ये आंध्र प्रदेशचा पुढील मुख्यमंत्री होण्यासाठी मला संमती दिली आहे.

Comments
Add Comment

Bihar and Bengal : बिहार-बंगालमध्ये वीज कोसळून ११ मृत्यू , भूस्खलनामुळे बद्रीनाथ महामार्ग ठप्प; मुसळधार पावसाचा अनेक राज्यांना वेढा

नवी दिल्ली : अनेक राज्यांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला असून वाहतूक, दैनंदिन

Faridabad Teacher Murder : बाप रे...३२ सेकंदात ३४ सपासप वार करून महिलेची निर्घृण हत्या; सर्व घटना CCTV मध्ये कैद, फरिदाबाद हादरले!

फरिदाबाद : एका बाजूला पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर असताना, दुसऱ्या बाजूला विद्यादानाच्या पवित्र भूमीत

Punjab Terror Plot : पंजाबमध्ये मोठा दहशतवादी कट उधळला! ISI शी संबंध असणाऱ्या चार अल्पवयीनांसह ९ जण जेरबंद

चंदीगड : पंजाबमध्ये मोठा दहशतवादी हल्ला (Punjab Terror Plot) घडवून आणण्याचा कट पंजाब पोलिसांनी वेळेत उधळून लावत मोठी कारवाई

Chandipura Virus : गुजरातमध्ये 'चांदीपुरा' व्हायरसचा धुमाकूळ! २२ बालकांचा मृत्यू, १८४ संशयित रुग्ण; जाणून घ्या काय आहेत धोक्याची लक्षणे ?

गांधीनगर : पावसाळ्याच्या दिवसांत गुजरात राज्यात एका अत्यंत घातक आणि प्राणघातक आजाराने थैमान घातले आहे.

udhayanidhi stalin : अभिनेत्री तृषावरील अश्लील टिप्पणी भोवली! विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांना अटक; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप!

चेन्नई : तामिळनाडूच्या राजकारणात मंगळवारी सकाळी एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक घडामोडी समोर आली. अभिनेत्री तृषा

Air India flight turbulence : हवेतील धक्क्यांमुळे एअर इंडियाचं विमान थेट खाली कोसळलं; १२ प्रवासी जखमी, दिल्लीत सुरक्षित लँडिंग

नवी दिल्ली : थायलंडच्या फुकेत शहरावरून दिल्लीकडे येणाऱ्या 'एअर इंडिया'च्या विमानाला मंगळवार, ४ ऑगस्ट रोजी हवेत