
पंतप्रधान नरेंद्र मोदीही राहणार उपस्थित
विजयवाडा : आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांचे नवे सरकार आज स्थापन होत असून, ते मुख्यमंत्रीपदाची (Chief Ministership) शपथ घेणार आहेत. या संदर्भात नायडू यांनी विजयवाडा येथील ए कन्व्हेन्शन सेंटरमध्ये एनडीएच्या सर्व १६४ आमदारांसोबत बैठक घेतली. यावेळी नायडूंच्या मंत्रिमंडळात २५ मंत्री असतील. यात टीडीपीचे १९, जनसेनेचे ४ व भाजपाचे २ मंत्री असणार आहेत.
लोकसभा निवडणुकीसह झालेल्या १७५ विधानसभा जागांच्या आंध्र प्रदेश विधानसभेत टीडीपीसोबत असलेल्या एनडीएने एकतर्फी विजय मिळवला होता. या निवडणुकीत टीडीपीचे १३५ आमदार, अभिनेते पवन कल्याण यांच्या जनसेनेचे २१ आमदार व भाजपाचे ११ आमदार निवडून आले आहेत. बैठकीनंतर चंद्राबाबू नायडू म्हणाले की, भाजपा, जनसेना आणि टीडीपीच्या सर्व आमदारांनी एनडीए सरकारमध्ये आंध्र प्रदेशचा पुढील मुख्यमंत्री होण्यासाठी मला संमती दिली आहे.