खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातून केवळ हलक्या वजनाच्या वाहनांनाच दुतर्फा वाहतुकीची मुभा असतानाही, अवजड वाहतुकीची वाहनेही मार्गस्थ होत होती. यामध्ये एस. टी. बस फेऱ्यांचा देखील समावेश होता.मात्र आता घाटातून एस. टी. बसला बंदी घालण्यात आली आहे. वाहतुकीला ब्रेक लावण्यासाठी, राष्ट्रीय महामार्ग खात्याने दोन्ही बाजूला मजबूत हाईट खांबांची उभारणी करत, अटकाव केला आहे. यामुळे एस. टी. बसचालकांची कोंडी झाली असून, कशेडी घाटाचा वापर करावा लागत आहे. यापूर्वी कशेडी बोगद्यातून दोन्ही दिशांना एस. टी. बसेसदेखील धावत होत्या. मात्र रत्नागिरीसह रायगड प्रशासनाने अवजड वजनांच्या वाहनांपाठोपाठ एस. टी. सेवा देखील बंद करण्याचा निर्णय घेतला.
कशेडी बंगला येथून परिसरातील २० ते २५ गावांचा यामुळे संपर्क तुटून ग्रामस्थांची परवड सुरू झाली होती. यानंतर पुन्हा वाहतुकीस परवानगी दिल्यानंतर दुतर्फा एस. टी. बससेवा सुरू होती. शिवसेना नेते रामदास कदम यांनी महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचना केल्या होत्या.