Monday, July 8, 2024
Homeक्रीडाAUS vs NAM: गोलंदाजीनंतर फलंदाजीतही ऑस्ट्रेलियाची कमाल, नामिबियाला ९ विकेटनी चारली धूळ

AUS vs NAM: गोलंदाजीनंतर फलंदाजीतही ऑस्ट्रेलियाची कमाल, नामिबियाला ९ विकेटनी चारली धूळ

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४मधील(t-20 world cup 2024) २४व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नामिबियाला पराभवाची धूळ चारली आहे. सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा गोलंदाजीत कमाल केली आणि त्यानंतर फलंदाजीतही चांगली कामगिरी करत नामिबियाविरुद्ध ९ विकेट आणि ८६ बॉल राखत विजय मिळवला.

सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या नामिबियाला कांगारूंनी १७ षटकांतच ७२ धावांवर ऑलआऊट केले होते.

नामिबियाचा कर्णधार गेरहार्ड इरामूसने केवळ सर्वाधिक ३६ धावा केल्या होत्या. तर सलामीवीर मिशेल वॅन लिंगेनने १० धावा केल्या. बाकी त्यांचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. ऑस्ट्रेलियाच्या अॅडम झाम्पाने तर चार बळी घेत नामिबियाच्या फलंदाजांना पिचवर टिकूच दिले नाही. त्यांचे एकामागोएक फलंदाज बाद होत होते. अखेर त्यांचा डाव ७२ धावांवर संपुष्टात आला.

विजयासाठी नामिबियाने ऑस्ट्रेलियाला ७३ धावांचे अगदी सोपे आव्हान दिले होते. हे आव्हान पूर्ण करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला केवळ ५.४ षटकेच खेळावी लागली. सलामीवीर डेविड वॉर्नरने २० धावा केल्या तर ट्रेविसहेड ३४ धावांवर नाबाद राहिला. मिशेल मार्शने नाबाद १८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात ९ विकेट राखत विजय मिळवला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -