Saturday, July 13, 2024
HomeमहामुंबईAiroli News : ऐरोलीत रेल्वेने लावलेली लोखंडी कमान कोसळली

Airoli News : ऐरोलीत रेल्वेने लावलेली लोखंडी कमान कोसळली

नवी मुंबई : ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावरील ऐरोली सेक्टर-३ येथे रेल्वे प्रशासनाने उभारलेली लोखंडी कमान कोसळल्याची घटना घडली. यात कोणतीही हानी झाली नाही. कोसळलेली कमान हटविण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले.

ठाणे – वाशी रेल्वे मार्गावर ऐरोली सेक्टर-३ येथे रेल्वे लाईन खाली जड वाहतुकीसाठी रेल्वे प्रशासनाने लोखंडी कमान उभी केली होती. ठाणे-बेलापूर मार्गावरून ऐरोली सेक्टर ३ कडे जाण्यासाठी रेल्वे अंडरपास वापर केला जातो. सदर अंडरपास शेजारी एमएमआरडीएकडून विक्रोळी शीळ उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू आहे. उड्डाण पुलाच्या बांधकामामुळे सदर रेल्वे प्रशासनाने उभारलेली कमान मंगळवारी दुपारी १२च्या दरम्यान अचानक कोसळली. या दुर्घटनेत कोणतीही जीवित व वित्त हानी झाली नाही.

कमान पडण्याचे समजताच रेल्वे प्रशासनाची टीम घटनास्थळी पोहोचून कमान हटविण्यात आली. या घटनेने काही वेळ खळबळ उडाली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -