सुरतमधून पासपोर्ट बनवलेल्या ४ बांगलादेशी नागरिकांना मुंबईत अटक; तर ५ जणांचा शोध सुरू

५ बांगलादेशी नागरिकांपैकी १ परदेशात काम करत असल्याची माहिती


मुंबई : बनावट पारपत्र बनवल्याप्रकरणी मुंबई दहशतवाद विरोधी पथकाने मुंबईतून ४ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे तर ५ जणांचा शोध सुरू आहे. त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व असलेली बनावट कागदपत्रं मिळाली आहेत. अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकाकडून तपासादरम्यान मिळालेल्या माहितीवरून पथकाने ही कारवाई केली.


या सर्वांनी गुजरातमधल्या सुरत इथले रहिवासी असल्याची बनावट कागदपत्रं देत सुरतमधून पारपत्र मिळवले आहे. तसेच शोध सुरू असलेल्या ५ बांगलादेशी नागरिकांपैकी १ भारतीय पारपत्रावर परदेशात काम करत असल्याची माहिती देखील पोलिसांना मिळाली आहे. विशेष म्हणजे यापैकी काही नागरिकांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय नागरिक म्हणून मतदानही केले आहे.

Comments
Add Comment

मुंबईत जमिनीखाली १८ मीटर खोलवर भुयारी मेट्रोला मिळणार बीएसएनएलचे नेटवर्क ?

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मागील काही दिवसांपूर्वी जेव्हीआरएल-बीकेसी-कफ परेड या भुयारी मेट्रो

भांडुप उषा नगर नाल्यावरील पुलांची कामे धिम्या गतीने, पण खर्च वाढला एवढा

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्यावतीने भांडुप येथील उषा नगर नाल्यावरील जुन्या पुलांचे बांधकाम पाडून

स्मशानभूमीच्या स्वच्छतेसाठी कंत्राट संपुष्टात,पण मुदत वाढीला तारीख पे तारीख

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबईतील स्मशानभूमी आणि दफनभूमींच्या स्वच्छतेसाठी महापालिकेच्यावतीने खासगी संस्थांची

वाहतूक कोंडी संपणार?

गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पाला गती मुंबई  : दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंडदरम्यान नवीन जोडमार्ग

कलिना आणि वांद्रे, पूर्व विधानसभा क्षेत्र भाजपला अनुकूल

आपल्या राजकीय वाटचालीबाबत बोलतांना उत्तर पूर्व जिल्हाध्यक्ष विरेंद्र म्हात्रे सांगतात, राजकारणात यायचे असा

आजपासून धारावीकरांसाठी विशेष मोहीम

प्रलंबित सर्वेक्षणात भाग घेता येणार १५ नोव्हेंबरपर्यंत मोहीम राबविली जाणार मुंबई  : विविध अन्य कारणांमुळे