Sunday, March 16, 2025
Homeताज्या घडामोडीTips: या टिप्स करा फॉलो... कमीत कमी पेट्रोलमध्ये चालणार कार

Tips: या टिप्स करा फॉलो… कमीत कमी पेट्रोलमध्ये चालणार कार

मुंबई: गाडी चालवताना कार मालक नेहमी पेट्रोलबाबत चिंतित असतो. प्रत्येकजण कोणत्या ना कारणाने पेट्रोल कसे वाचवता येईल याकडे लक्ष असते. जर गाडी चालवताना काही बाबींवर लक्ष ठेवले तर कारचा मायलेज वाढू शकतो. आम्ही आज तुम्हाला काही टिप्स सांगत आहोत ज्यामुळे तुमच्या गाडीचे इंधन वाचू शकते आणि दूरचा प्रवास करू शकता.

टायरच्या प्रेशवर ठेवा लक्ष

टायरचा प्रेशर आणि मायलेज यांच्यात संबंध आहे. गाडीच्या टायरमध्ये हवा कमी-जास्त असल्यास टायर आणि रोड यांच्यातील संपर्कात फरक पडतो. यामुळे टायर रस्त्यावर योग्य ग्रिप पकडू शकत नाही. कार निर्माता कंपनी टायरमध्ये किती हवा भरली पाहिजे याची माहिती देतात.

सतत एसी सुरू ठेवल्याने कमी होते मायलेज

कारच्या आत सतत एसी चालू ठेवल्यास कारचा मायलेज ३० टक्क्यांपर्यंत कमी होते. कारचा एसी सुरू ठेवल्याने जितक्या फ्युएलमध्ये तुम्ही ५०० किमीचा प्रवास करत असाल तितक्याच फ्युएलमध्ये एसी बंद केल्यास तुम्ही ६०० ते ६५० किमीचा प्रवास करू शकता.

योग्य गिअरचा वापर

कारचे गिअर योग्य पद्धतीने वापरल्यास कारचा मायलेज वाढण्यास मदत होते. अचानकपणे कारचा स्पीड वाढवणे आणि अचानक स्पीड कमी केल्याने कारच्या मायलेजवर परिणाम होतो. जर तुम्ही पाचव्या गिअरमध्ये ८० किमी प्रति तासाच्या स्पीडने गाडी चालवत आहात तर गाडीचा मायलेज चांगला करण्यासाठी हा एक योग्य स्पीड आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -