Saturday, July 6, 2024
Homeताज्या घडामोडीKalki 2898 AD : चाहत्यांची प्रतिक्षा संपली! 'कल्की २८९८ एडी'चा भन्नाट ट्रेलर...

Kalki 2898 AD : चाहत्यांची प्रतिक्षा संपली! ‘कल्की २८९८ एडी’चा भन्नाट ट्रेलर रिलीज

धमाकेदार अ‍ॅक्शन आणि एआयची किमया; चाहत्यांचा भरघोस प्रतिसाद

मुंबई : ‘कल्की २८९८ एडी’ (Kalki 2898 AD) या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून लोकांमध्ये या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाचे पोस्टर, अमिताभ बच्चनचा लूक आणि प्रभासचा नवा अवतार लाँच करून निर्मात्यांनी चाहत्यांचा उत्साह टिकवून ठेवण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. बऱ्याच दिवसांपासून प्रेक्षक या चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहत होते. आता अखेर ट्रेलर प्रदर्शित झाला असून चित्रपटाची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

‘कल्की २८९८ एडी’ या साय-फाय आणि पीरियोडिक ड्रामा असलेल्या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत बिग बी बच्चन, प्रभास, दीपिका पादुकोण, कमल हसन, नाग आश्विन, दिशा पटानी सह अनेक ताकदीचे कलाकार आहेत. नुकतेच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये, सुरूवातीला काशी शहर दिसत आहे. त्या शहराला चित्रपटामध्ये जगातील पहिले शहर म्हणून ओळख आहे. ६००० वर्षांपूर्वी असलेल्या ह्या कथानकामध्ये भविष्यकालीन जगाचे चित्र दाखवण्यात आले आहे. या चित्रपटामध्ये नव्या युगाची नांदी पाहायला मिळत असून, ही नांदी काहीतरी वेगळे करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसत आहे.

‘या’ तारखेला चित्रपट होणार प्रदर्शित

या चित्रपटामध्ये अनेक दिग्गज कलाकारांचा हटके लूक पाहायला मिळणार आहे. धडाकेबाज ॲक्शन सीन्स, अफलातून स्क्रिन प्ले आणि हटके कथानक असलेल्या या चित्रपटाची प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत. येत्या २७ जून २०२४ रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिंदी, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि तामिळ भाषेत रिलीज होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती ६०० कोटींमध्ये, करण्यात आलेली असून या चित्रपटामध्ये अनेक नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. या चित्रपटाची उत्सुकता फक्त भारतातच नाही तर जगभरामध्ये कायम आहे. लवकरच या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला जगभरामध्ये सुरूवात होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -