Friday, March 21, 2025
Homeक्रीडाT-20 World cup 2024: पाकिस्तानला अखेर विजयाचा सूर गवसला, कॅनडावर ७ विकेटनी...

T-20 World cup 2024: पाकिस्तानला अखेर विजयाचा सूर गवसला, कॅनडावर ७ विकेटनी मात

न्यूयॉर्क: टी-२० वर्ल्डकपमध्ये(T-20 World cup 2024) आधी यूएसए आणि त्यानंतर भारताकडून पराभव पत्करलेल्या पाकिस्तानची आज कॅनडाच्या संघाविरुद्ध कसोटी होती. या कसोटीत पाकिस्तान खरा उतरला आहे. पाकिस्तानने या सामन्यात कॅनडाला ७ विकेटनी हरवत विजयाला गवसणी घातली. त्यांचा वर्ल्डकपमधील हा पहिलाच विजय आहे.

हा सामना खरंतर पाकिस्तानसाठी करो वा मरो होता. पाकिस्तानला पहिल्या सामन्यात नवख्या यूएसएकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने त्यांच्या तोंडातून विजयाचा घास हिरावून घेतला. त्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचेच होते. अखेर त्यांना विजयी सूर गवसला.

या सामन्यात कॅनडाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ बाद १०६ धावा होत्या. पाकिस्तानसमोर विजयासाठी १०७ धावांचे आव्हान होते. हे आव्हान खरंतर मोठे नव्हते. मात्र ते पूर्ण करताना पाकिस्तानला १७.३ षटके खर्च करावी लागली तसेच ३ विकेटही त्यांनी गमावल्या.

१०७ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानची सुरूवात मात्र संथ झाली. सुरूवातीला पाकिस्तानचे फलंदाज धावा काढण्यासाठी धडपडत होते. मात्र सलामीवीर मोहम्मद रिझवान खेळपट्टीवर शेवटपर्यंत टिकून राहिला. त्याने ५३ धावांची खेळी केली. तर कर्णधार बाबर आझमने ३३ धावा केल्या. बाकी फलंदाज एकेरी धावा करून बाद झाले.

याआधीने कॅनडाने सलामीवीर आरोन जॉन्सनच्या ५२ धावांच्या जोरावर २० षटकांत केवळ १०६ धावा केल्या होत्या. कॅनडाच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले नव्हते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -