Monday, June 16, 2025

द. आफ्रिकेने वर्ल्डकपमध्ये रचला इतिहास, १० वर्ष जुना रेकॉर्ड झाला उद्ध्वस्त

द. आफ्रिकेने वर्ल्डकपमध्ये रचला इतिहास, १० वर्ष जुना रेकॉर्ड झाला उद्ध्वस्त

मुंबई: दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला टी-२० वर्ल्डकप २०२४च्या सामन्यात ४ धावांनी हरवले. हा सामना १० मार्चला न्यूयॉर्कमध्ये रंगला. द. आफ्रिकेने बांगलादेशविरुद्ध ११४ धावांचे आव्हान डिफेंड करत टी-२० वर्ल्डकपमधील सार्वकालीन रेकॉर्ड आपल्या नावे केला.


या आधी हा रेकॉर्ड श्रीलंकेच्या नावावर होता. २०१४च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये चटगांवमध्ये न्यूझीलंडविरुद्ध १२० धावांचा बचाव केला होता. तर दक्षिण आफ्रिकेकडून टी-२०मध्ये यशस्वीपणे बचाव केलेले सर्वात कमी लक्ष्य आहे. याआधी त्यांचे कमी लक्ष्य ११६ इतके होते हे त्यांनी २०१३मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळताना डिफेंड केले होते.


द. आफ्रिकेचा बांगलादेशवर या फॉरमॅटमध्ये सलग नववा विजय आहे. यातच दक्षिण आफ्रिका टी-२० वर्ल्डकपमध्ये एक, दोन, तीन आणि चार धावांच्या फरकाने जिंकणारा पहिला संघ ठरला आहे.


कोणताही दुसरा संघ दोन वेळाहून अधिक पाच धावांपेक्षा कमी अंतराने जिंकण्यात यशस्वी ठरला नाही.

Comments
Add Comment