Sunday, May 11, 2025

देशमहत्वाची बातमी

Odisha CM: ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदी मोहन चरण माझी यांच्या नावावर शिक्कामोर्तब

Odisha CM: ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदी मोहन चरण माझी यांच्या नावावर शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: २४ वर्षांनी ओडिशामध्ये सत्ता बदल करणाऱ्या भाजपने राज्यात मोहन चरण माझी यांना नवे मुख्यमंत्री म्हणून निवडले आहे. यूपी-मध्य प्रदेश-छत्तीसगड प्रमाणेच ओडिशामध्ये भाजपने एक मुख्यमंत्री आणि दोन उप मुख्यमंत्री असा फॉर्म्युला लागू केला आहे.


ओडिशाचे दोन उप मुख्यमंत्री असणार आहेत. यात एका महिला उपमुख्यमंत्र्याचा समावेश आहे. पार्वती फरीदा आणि केवी सिंह देव राज्याचे उपमुख्यमंत्री असतील. मोहन माझी ओडिशाच्या राजकारणात पहिल्यांदा मोठ्या पदावर आहेत.



कोण आहेत मोहन माझी?


खरंतर, २०२४च्या ओडिशा विधानसभा निवडणुकीत भाजप नेता मोहन चरण माझी यांनी बिजू जनता दलाच्या मीना माझी यांना ११,५७७ मतांच्या अंतराने हरवत क्योझर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. ५२ वर्षीय मोहन चरण माझी हे चार वेळा आमदार आहेत. त्यांनी २००० ते २००९ पर्यंत दोन वेळा क्योझर येथे प्रतिनिधित्व केले आहे. यानंतर २०१९मध्ये भाजपच्या तिकीटावर क्योंझर येथून निवडणूक लढवली होती आणि विजय मिळवला होता.



कसा होता प्रवास?


मोहन चरण माझी यांचा जन्म ६ जानेवारी १९७२ला ओडिशाच्या क्योझरमध्ये झाला. ते अनुसूचित जमातीतून येतात. त्यांनी डॉ. प्रियंका मरांडी यांच्याशी लग्न केले आहे. त्यांनी आपल्या राजकीय करिअरची सुरूवात सरपंच म्हणून केली होती.


यानंतर २०००मध्ये त्यांनी पहिल्यांदा आमदारपदाची निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. भाजपने त्यांना राज्य आदिवासी मोर्चाचे सचिव बनवले.



ओडिशाचे १५वे मुख्यमंत्री असणार मोहन चरण मांझी


मोहन चरण माझी हे ओडिशाचे १५वे मुख्यमंत्री असतील. जेव्हा त्यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक जिंकली होती तेव्हा नवीन पटनाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कमान सांभाळली होती.

Comments
Add Comment