काय आहे कारण?
नागपूर : राज्यामध्ये सध्या पावसाळी वातावरण (Monsoon 2024) आहे. पावसाची आतुरतेने वाट पाहणार्या नागरिकांना उन्हाच्या तडाख्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, अद्याप राज्याच्या काही भागांमध्ये पाऊस पोहोचलेला नाही. अशी परिस्थिती असताना हवामान तज्ज्ञांनी (Meteorologists) शेतकर्यांना (Farmers) एक मोलाचा सल्ला दिल्ला आहे. शेतकर्यांनी पेरणीची (Sowing) घाई करु नये, असं हवामान तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
मान्सूनचे आमगन झाल्यामुळे अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतीच्या कामाला आणि पेरण्यांना सुरूवात केली. मात्र काही ठिकाणी पाऊस न पोहोचल्यामुळे या भागातील शेतकरी अद्याप मान्सूची प्रतीक्षा करत आहेत. अशामध्ये शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी याबाबत हवामान तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना महत्वाची माहिती दिली आहे.
विदर्भातील मान्सूनच्या आगमनाची तारीख साधारणतः १५ जून असली तरी यंदा चार दिवस आधीच पश्चिम विदर्भात मान्सूनचे आगमन झाले त्यामुळे शेतकरी आनंदी झाले आहेत. तर दुसरीकडे पूर्व विदर्भामध्ये मान्सून सुरू झाला नाही त्यामुळे येथील नागरिक आणि शेतकरी मान्सूची अजूनही प्रतीक्षा करत आहेत.
पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये. जोपर्यंत पेरणीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत प्रतीक्षा करण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे. जून महिन्याच्या अखेरीपर्यंत समाधानकारक पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे. नागपूर प्रादेशिक हवामान विभाग तज्ज्ञ प्रवीण कुमार यांनी ही महत्वाची माहिती दिली आहे.