Monday, May 12, 2025

देशताज्या घडामोडी

Bullet Train : दिल्लीकरांचा प्रवास होणार आणखी सुपरफास्ट!

Bullet Train : दिल्लीकरांचा प्रवास होणार आणखी सुपरफास्ट!

अहमदाबाद-मुंबईनंतर दिल्ली-पाटणा प्रवास होणार अवघ्या ३ तासात


नवी दिल्ली : दिल्ली ते पाटणा (Delhi To Patna) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अहमदाबाद ते मुंबईनंतर आता दिल्लीकरांचाही प्रवास आणखी सुपरफास्ट होणार आहे. लवकरच दिल्ली ते पाटणा दरम्यान बुलेट ट्रेन (Bullet Train) सुरु होणार आहे. त्यामुळे दिल्लीकरांचा १७ तासांचा प्रवास आता केवळ ३ तासात पूर्ण होणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबाद-मुंबईनंतर आता दिल्ली हावडा बुलेट ट्रेनचे काम जलद गतीने सुरु आहे. दिल्ली हावडा मार्गावर धावणारी बुलेट ट्रेन बक्सर, पाटणा आणि गया मार्गे जाणार आहे. यासाठी या तिन्ही जिल्ह्यात स्थानक तयार करण्यात येणार आहे. ही बुलेट ट्रेन ३५० किमी ताशी वेगाने धावणार आहे. याआधी दिल्ली ते पाटणा प्रवासासाठी १७ तास लागायचे. परंतु बुलेट ट्रेनने दिल्लीकरांचा हा प्रवास अवघ्या ३ तासात पूर्ण होणार आहे. त्यामुळे नागरिकांचे जवळपास १४ तास वाचणार आहेत.


दरम्यान, बुलेट ट्रेन सुरु झाल्याने प्रवाशांची मोठी सोय होणार असून हा प्रवास प्रवाशांसाठी नक्कीच पर्वणी ठरणार आहे.

Comments
Add Comment