
सानियाला दीर्घकाळाच्या प्रतीक्षेनंतर हज यात्रेला जाण्याची संधी मिळाली आहे. तिने लिहिले- पवित्र यात्रेला जाण्याची अविश्वसनीय संधी मिळाली आहे. सानियाने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले, माझ्या प्रिय मित्रांनो, मी एका नव्या अनुभवाची तयारी करत आहे. मी तुमच्या सगळ्यांची माझ्या चुकीसाठी माफी मागते.
View this post on Instagram
माझे हृदय यावेळेस अतिशय भावूक आणि कृतज्ञतेने भरलेले आहे. मला विश्वास आहे की अल्ला माझ्या प्रार्थनांचा स्वीकार करतील आणि मला मार्गदर्शन करतील.
मी खूप भाग्यवान आहे. कृपया मला तुमचे विचार आणि प्रार्थनांमध्ये जरूर स्थान द्या. मी जीवनातील एका खास प्रवासाला निघाले आहे.