Thursday, July 25, 2024
Homeदेशएनडीए सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

गृह अमित शहा, संरक्षण राजनाथ सिंह, अर्थ निर्मला सितारमण तर रस्ते विकास नितीन गडकरींकडे

शिवराज सिंह चौहान यांच्याकडे कृषी मंत्रालय

अश्विनी वैष्णव यांच्याकडे रेल्वे मंत्रालय

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील तिसऱ्या मंत्रिमंडळाचा खातेवाटप जाहीर करण्यात आला असून अमित शाह यांच्याकडे गृहखाते व सहकार खाते कायम ठेवण्यात आले आहे. सर्व महत्त्वाची खाती भाजपने वरिष्ठ मंत्र्यांकडे दिली असून मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात नितीन गडकरी यांना पुन्हा रस्ते आणि परिवहन वाहतूक मंत्रालय, अमित शाह यांना गृह, एस जयशंकर यांना परराष्ट्र, राजनाथ सिंह यांना संरक्षण आणि अश्विनी वैष्णव यांना रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नवीन एनडीए आघाडी सरकारच्या ७१ मंत्र्यांसह शपथ घेतली होती. मोदींच्या या तिसऱ्या मंत्रिमंडळात ३० कॅबिनेट मंत्री, पाच जणांकडे स्वतंत्र प्रभार आणि ३६ राज्यमंत्री आहेत. मोदी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीनंतर भाजपने गृह मंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालय स्वतःकडे ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालय, अणुऊर्जा विभाग, अंतराळ विभाग, सर्व महत्त्वाचे धोरणात्मक मुद्दे आणि इतर सर्व पोर्टफोलिओ जे कोणत्याही मंत्र्याला दिलेले नाहीत, या सर्व खात्यांचा कार्यभार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे.

सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी आता बिहारच्या जितन राम मांझी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते शिवराज सिंह चौहान यांच्याकडे कृषी आणि शेतकरी कल्याण व पंचायत आणि ग्रामीण विकास मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना ऊर्जा मंत्रालय देण्यात आले आहे. यासोबतच त्यांना नगरविकास मंत्रालयाचीही जबाबदारी देण्यात आली आहे. खट्टर हे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री असून त्यांनी पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवून विजय मिळवला आहे.

श्रीपाद नाईक यांची या खात्यांच्या राज्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, गोव्यातील नेते श्रीपाद नाईक यांची या खात्यांच्या राज्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांना आरोग्यमंत्रालय, धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षण, गजेंद्र शेखावत यांना कला पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालय, सीआर पाटील यांना जलशक्ती मंत्रालय, चिराग पासवान यांना क्रीडा व युवक मंत्रालय, एचडी कुमारस्वामी यांना अवजड उद्योग मंत्रालय, ज्योतिरादित्य शिंदे यांना टेलिकॉम मंत्रालय, अश्विनी वैष्णव यांना माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि टीडीपी नेते राममोहन नायडू यांच्याकडे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील मंत्र्यांना कोणती खाती मिळाली?

कॅबिनेट मंत्री

१) नितीन गडकरी : रस्ते आणि परिवहन वाहतूक
२) पियुष गोयल : वाणिज्य राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)
३) प्रतापराव जाधव : आयुष, आरोग्य

राज्यमंत्री

१) रामदास आठवले : सामाजिक न्याय
२) रक्षा खडसे : क्रीडा आणि युवक कल्याण
३) मुरलीधर मोहोळ : सहकार व नागरी उड्डाण

मोदींच्या मंत्रिमंडळात कुणाला कोणतं मंत्रालय?

अमित शाह – गृहमंत्रालय
राजनाथ सिंह – संरक्षण मंत्रालय
एस जयशंकर – परराष्ट्र
निर्मला सीतारमन – अर्थमंत्रालय
शिवराज सिंह चौहान- कृषी मंत्रालय
जतीन राम – सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय
अन्नपूर्णा देवी – महिला आणि बाल विकास मंत्रालय
भूपेंदर यादव – पर्यावरण
राम मोहन नायडू – नागरी उड्डाण मंत्रालय
जेपी नड्डा – आरोग्य मंत्रालय
सर्वानंद सोनोवाल – पोर्ट शिपिंग मंत्रालय
सी आर पाटील – जलशक्ती
किरण रिजीजू – संसदीय कार्यमंत्री
धर्मेंद्र प्रधान – शिक्षण मंत्री

राज्यमंत्री

श्रीपाद नाईक- गृहनिर्माण आणि ऊर्जा राज्यमंत्री
शोभा करंदाजे – राज्यमंत्री – सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय
शांतनु ठाकुर – पोर्ट शिपिंग मंत्रालय, राज्यमंत्री

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -