PM Narendra Modi : पंतप्रधान म्हणून तिसर्‍या कार्यकाळात नरेंद्र मोदींची पहिली सही शेतकर्‍यांसाठी!

पीएम किसान निधीचा १७ वा हप्ता जारी


नवी दिल्ली : नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काल पंतप्रधानपदाची (Prime ministership) शपथ घेतली आणि ते तिसर्‍यांदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. यानंतर त्यांनी अजिबात विश्रांती न घेता लगेच आपल्या कामाला सुरुवात केली आहे. त्यांनी घेतलेला पहिलाच निर्णय हा देशातील शेतकर्‍यांच्या (Farmers) हिताचा आहे.


नरेंद्र मोदी यांनी आज अधिकृतपणे आपल्या कार्यालयात जाऊन पंतप्रधानपदाचा पदभार स्विकारला. यावेळी सर्वांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले. यानंतर मोदींनी पीएम किसान निधीचा (PM Kisan nidhi) १७ वा हप्ता जारी केला.


लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) गेले अनेक दिवस आचारसंहिता (Code of conduct) लागू झाल्यामुळे पंतप्रधान किसान निधीमार्फत जो निधी शेतकर्‍यांच्या खात्यात थेट जमा होतो, तो दिला गेला नव्हता. त्यामुळे मोदींनी तिसर्‍या कार्यकाळात पहिली सही पीएम किसान निधीच्या फाईलवर केली आहे. ज्यामुळे हा निधी सगळ्या शेतकर्‍यांच्या खात्यात पोहोचणार आहे.

Comments
Add Comment

Gas Supply Changes : स्वयंपाकाच्या गॅसच्या पुरवठ्यात होणार बदल

नवी दिल्ली : स्ट्रेट ऑफ होर्मुझ भागातील वाढत्या लष्करी आणि राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने

Randhir Jaiswal : पीओजेकेतील निवडणुका दिखावा, मानवी हक्क उल्लंघन लपवण्याचा प्रयत्न- रणधीर जयस्वाल

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या ताब्यातील जम्मू-काश्मीर (पीओजेके) येथे घेतल्या जात असलेल्या तथाकथित विधानसभा

Narendra Modi : आसाममधील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची खासदारांसोबत आढावा बैठक

नवी दिल्ली : आसाममधील भीषण पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राज्यातील

Uttarakhand : उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार; चारधाम यात्रा दोन दिवसांसाठी स्थगित

पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस, मालदेवतामध्ये २३३ मिमी पावसाची शक्यता देहरादून : उत्तराखंडमध्ये सक्रिय

Himachal Pradesh : भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

Suneel Anand Passed Away : अभिनेते देव आनंद यांच्या मुलाचे निधन; ज्या रुग्णालयात वडिलांनी घेतला अखेरचा श्वास, तिथेच लेकाचाही मृत्यू

लंडन : हिंदी चित्रपटसृष्टीचे सदाबहार अभिनेते दिवंगत देव आनंद (Dev Anand) यांच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला