मुंबई: काळे मीठ हे प्रकृतीने अतिशय थंड असते. याला तुम्ही तुमच्या डाएटमध्ये सामील केल्याने पोट आणि शरीर थंड राहते. इतकंच नव्हे तर अनेक आजारांपासून बचाव होण्यास मदत होते. काळ्या मीठामध्ये लॅक्सेटेसिव्ह गुण असतात जे मेटाबॉलिक रेट वाढवण्याचे काम करतात.
इतकंच नव्हे तर शरीराचे बॉवेल मूव्हमेंटसाठी चांगले असते. याशिवाय याचे अनेक फायदे आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
काळ्या मीठाचे पाणी पिण्याचे फायदे
लिव्हर डिटॉक्स होते
कोमट पाण्यात काळे मीठ मिसळून पाणी प्यायल्याने शरीरास अनेक प्रकारचे फायदे मिळतात. याशिवाय लिव्हर डिटॉक्सिफाय होण्यास मदत होते. या पाण्यामुळे लिव्हर सेल्समध्ये जमलेली घाण बाहेर निघण्यास मदत होते.
शरीर होते डिटॉक्स
कोमट पाण्यात काळे मीठ टाकून प्यायल्याने शरीरातील घाण बाहेर टाकण्यास मदत होते. शरीर अथवा नसांमध्ये चिटकलेली सर्व घाण यामुळे फ्लश आऊट होते. ही फ्लश आऊट करण्यास महत्त्वाची भूमिका निभावतात.
स्किन आणि केसांसाठी चांगले
कोमट पाण्यात काळे मीठ मिसळून प्यायल्याने स्किन आणि केसांसाठी चांगले असते. यामुळे स्किन अधिक ग्लोईंग बनते.