मुंबई: भारत संचार निगम लिमिटेड(BSNL) सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. कंपनी ग्राहकांना अनेक प्रीपेड प्लान्स
ऑफर करत असते. हे प्लान्स ग्राहकांच्या विविध गरजांच्या हिशेबाने ऑफर केलेले असतात. एक असाच प्लान कंपनीकडे २८ दिवसांची व्हॅलिडिटी असलेला आहे. हा प्लान अनेक पद्धतीने चांगला आहे. कारण याची किंमती ११० रूपयांपेक्षा कमी आहे.
जाणून घेऊया या प्लानबद्दल…
आम्ही येथे बीएसएनएलच्या FRC 108 रूपयांच्या प्लानबद्दल बोलत आहोत. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज १ जीबी डेटा दिला जातो. दरम्यान, कोणतेही SMS बेनिफिट ग्राहकांना मिळत नाहीत. ग्राहकांना एसएमएस पाठवण्यासाठी टॉकटाईसोबत रिचार्ज करू शकतात. यात लोकल एसएमएससाठी ८० पैसे प्रति एसएमएस आणि नॅशनल एसएमएससाठी १.२० रुपये प्रति मेसेज चार्ज केले जातात.
तसेच BSNL एक १०७ रूपयांचा प्लान ग्राहाकांना ऑफर करते. हा ट्रेंडिंग प्लान आहे ज्यात ग्राहकांना ३५ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. ग्राहकांना या प्लानमध्ये ३ जीबी डेटा आणि २०० मिनिट फ्री व्हॉईस कॉलिंग आणि ३५ दिवसांसाठी बीएसएनएल ट्यून्स दिली जाते.