Sonakshi Sinha : हिरामंडीच्या यशानंतर सोनाक्षी सिन्हा अडकणार लग्नबंधनात!

बॉयफ्रेंड जहीरसोबत 'या' दिवशी बांधणार लग्नगाठ


मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) सध्या तिच्या संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) दिग्दर्शित 'हिरामंडी' (Heeramandi) या वेब सिरीजमुळे प्रचंड चर्चेत आहे. या सिरीजमधील तिची दुहेरी भूमिका चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरली. यानंतर सोनाक्षीच्या चाहत्यांसाठी आणखी एक खुशखबर आहे. बॉलिवूडची दबंग गर्ल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. सोनाक्षी तिचा बॉयफ्रेंड जहीर इक्बालसोबत (Zaheer Iqbal) लग्नगाठ बांधणार आहे. या सोहळ्याला काही निवडक व जवळच्या लोकांनाच आमंत्रण देण्यात आलं असून यात 'हिरामंडी'च्या टीमची विशेष उपस्थिती असणार आहे.


सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल गेली काही वर्षे एकमेकांना डेट करत आहेत. गेल्या वर्षी सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांनी आपलं प्रेम जगजाहीर केलं होतं. त्यानंतर दोघांचे एकत्र अनेक फोटोज, व्हिडीओज ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. सोनाक्षी जहीरसोबत येत्या २३ जूनला लग्नबंधनात अडकू शकते. मात्र, अद्याप लग्नाबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही.



कशी आणि कुठे झाली जहीर आणि सोनाक्षीची भेट?


जहीर आणि सोनाक्षीच्या भेटीसोबत सलमान खानचं (Salman Khan) एक खास नातं आहे. सोनाक्षीने दबंग या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. यात ती सलमान खानसोबत झळकली होती. तर जहीर इक्बाल हा सलमानचा बालपणीचा मित्र इकबाल रतनसी यांचा मुलगा असून त्याला सलमाननेच आपल्या प्रोडक्शन बॅनरअंतर्गत निर्मिती करण्यात आलेल्या 'नोटबुक' या फिल्ममधून लाँच केलं. सलमान खानने आयोजित केलेल्या पार्टीत सोनाक्षी आणि जहीरची पहिली भेट झाली. त्यांच्यात चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सोनाक्षी आणि जहीरने 'डबल XL' नामक चित्रपटात एकत्र काम केलं आहे. जहीरआधी सोनाक्षी अर्जुन कपूरला डेट करत होती. आता चाहत्यांना जहीर आणि सोनाक्षी त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा कधी करणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

Comments
Add Comment

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू

INS Mangrol : ‘आयएनएस मंगरोल'मुळे नौदलाची ताकद वाढली; पाण्याखालील शत्रूंच्या हालचालींवर ठेवणार नजर!

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढली आहे. स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस मंगरोल’ (INS Mangrol) ही पाणबुडीविरोधी