Thursday, March 20, 2025
Homeताज्या घडामोडीSonakshi Sinha : हिरामंडीच्या यशानंतर सोनाक्षी सिन्हा अडकणार लग्नबंधनात!

Sonakshi Sinha : हिरामंडीच्या यशानंतर सोनाक्षी सिन्हा अडकणार लग्नबंधनात!

बॉयफ्रेंड जहीरसोबत ‘या’ दिवशी बांधणार लग्नगाठ

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) सध्या तिच्या संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) दिग्दर्शित ‘हिरामंडी’ (Heeramandi) या वेब सिरीजमुळे प्रचंड चर्चेत आहे. या सिरीजमधील तिची दुहेरी भूमिका चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरली. यानंतर सोनाक्षीच्या चाहत्यांसाठी आणखी एक खुशखबर आहे. बॉलिवूडची दबंग गर्ल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. सोनाक्षी तिचा बॉयफ्रेंड जहीर इक्बालसोबत (Zaheer Iqbal) लग्नगाठ बांधणार आहे. या सोहळ्याला काही निवडक व जवळच्या लोकांनाच आमंत्रण देण्यात आलं असून यात ‘हिरामंडी’च्या टीमची विशेष उपस्थिती असणार आहे.

सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल गेली काही वर्षे एकमेकांना डेट करत आहेत. गेल्या वर्षी सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांनी आपलं प्रेम जगजाहीर केलं होतं. त्यानंतर दोघांचे एकत्र अनेक फोटोज, व्हिडीओज ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. सोनाक्षी जहीरसोबत येत्या २३ जूनला लग्नबंधनात अडकू शकते. मात्र, अद्याप लग्नाबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

कशी आणि कुठे झाली जहीर आणि सोनाक्षीची भेट?

जहीर आणि सोनाक्षीच्या भेटीसोबत सलमान खानचं (Salman Khan) एक खास नातं आहे. सोनाक्षीने दबंग या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. यात ती सलमान खानसोबत झळकली होती. तर जहीर इक्बाल हा सलमानचा बालपणीचा मित्र इकबाल रतनसी यांचा मुलगा असून त्याला सलमाननेच आपल्या प्रोडक्शन बॅनरअंतर्गत निर्मिती करण्यात आलेल्या ‘नोटबुक’ या फिल्ममधून लाँच केलं. सलमान खानने आयोजित केलेल्या पार्टीत सोनाक्षी आणि जहीरची पहिली भेट झाली. त्यांच्यात चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सोनाक्षी आणि जहीरने ‘डबल XL’ नामक चित्रपटात एकत्र काम केलं आहे. जहीरआधी सोनाक्षी अर्जुन कपूरला डेट करत होती. आता चाहत्यांना जहीर आणि सोनाक्षी त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा कधी करणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -