Wednesday, July 17, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेठाणे जिल्ह्यातील २३ अनधिकृत शाळा बंद

ठाणे जिल्ह्यातील २३ अनधिकृत शाळा बंद

ठाणे जिल्ह्यातील अनधिकृत माध्यमिक शाळेत प्रवेश घेऊ नका – शिक्षणाधिकारी माध्यमिक ललीता दहितुले यांचे आवाहन

ठाणे : ठाणे जिल्ह्यात एकूण २४ माध्यमिक शाळा अनधिकृतपणे सुरू होत्या. त्यापैकी २३ शाळा बंद केल्या असून सद्यस्थितीत एक अनधिकृत शाळा सुरू आहे. या एक अनधिकृत शाळेवर एफ.आय.आर दाखल करण्यात आला आहे. पुढील शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता या अनधिकृत शाळेत प्रवेश घेऊ नये असे आवाहन शिक्षणाधिकारी माध्यमिक ललीता दहितुले यांनी केले आहे.

ठाणे जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची यादी प्रकाशित करण्यामागे हाच उद्देश आहे कि पालकांनी पाल्याचे माध्यमिक शाळेत प्रवेश घेताना अनधिकृत शाळेत प्रवेश घेऊ नये. पालकांनी अधिक माहिती घेऊनच पाल्याचे शाळेत प्रवेश निश्चित करावे , असे ललीता दहितुले यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात बंद अनधिकृत माध्यमिक शाळा

१. स्टार इंग्लिश हायस्कुल, दिवा, ठाणे मनपा क्षेत्र,
२. डिवाईन ग्रेस हायस्कुल, वज्रेश्वरी ता. भिवंडी जि. ठाणे,
३. आर एन इंग्लिश स्कूल कोन गाव भिवंडी ठाणे,
४. फरान इंग्लिश मिडीअम स्कुल,गौरीपाडा, भिवंडी जि.ठाणे,
५. आरंभ इंग्लिश स्कुल श्री, गणेश नगर चौळ गणेश मंदिराचे मागे दिवा आगासन रोड दिवापुर्व,
६. न्यु गुरुकुल कॉन्व्हेंट स्कुल श्लोकनगर दातिवली रोड दिवा पुर्व
७. ग्रीन व्व्हॅली कॉन्व्हेंट स्कुल,शिवसर्थ अपार्ट सदगुर नगर, दिवा आगासन दिवा जि.ठाणे,
८. एस. एस. इंग्लिश स्कुल बाबुराव रेसिडेंन्सी हनुमान मंदिर निअर दिवा,
९. आर एल पी हायस्कुल शिवम अपार्ट मुंब्रादेवी कॉलनी दिवा,
१०. आदर्श गुरुकुल स्कुल निअर जिव्हाळा हॉल दिवा इंग्रजी,
११. आदर्श गुरुकुल स्कुल वैभव ढाब्यासमोर दिवा शिळ रोड दिवा पुर्व माध्यम मराठी,
१२. आदर्श गुरुकुल स्कुल वैभव ढाब्यासमोर दिवा शिळ रोड दिवा पुर्व माध्यम इंग्रजी,
१३. एस आर पी इंग्लिश स्कुल वक्रतुंडनगर दिवा,
१४. ओमसाई इंग्लिश स्कुल,दातिवली रोड दिवा जि.ठाणे,
१५. श्री. विद्याज्योती इंग्लिश स्कुल,नारायण कॉम्पलेस्क मुंब्रादेवी कॉलनी रोड मुंब्रा जि.ठाणे,
१६. सिम्बॉयसिस स्कूल, सुंदरबन नगर, दातिवली रोड दिवा,
१७. केम्ब्रीज इंग्लिश स्कूल,मानसी कॉम्प्लेक्स भोलेनाथ मुंब्रादेवी कॉलनी रोड मुंब्रा जि.ठाणे,
१८. पब्लीक इंग्लिश स्कुल,गणेशपाडा दातिवली दिवा,
१९. आर्य गुरुकुल इंग्लिश स्कुल दातिवली रोड दिवा,
२०. श्रीराम कृष्णा इंग्लिाश स्कुल, दिवा दातिवली रोड दिवा,
२१. स्मार्ट एज्युकेशन इंग्लिश स्कु मुंब्रा,
२२. जे डी इंग्लिश स्कुल फेस २ श्लोक नगर मुंब्रा जि.ठाणे,
२३. भारत इंग्लिश स्कुल गुरु कृपा अपार्ट सिध्दीविनायक नगर दिवा

जिल्ह्यात अनधिकृत सुरू असलेली माध्यमिक शाळा

१. अल मुनीहाज सेकंडरी हायस्कुल, बेलापूर, नवी मुंबई

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -