Sunday, May 11, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीक्राईम

Accident : भीषण अपघात! पुण्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्येही 'हिट अ‍ॅण्ड रन'

Accident : भीषण अपघात! पुण्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्येही 'हिट अ‍ॅण्ड रन'

अपघातानंतर तरुण फरार; पोलिसांकडून शोध सुरु


छत्रपती संभाजीनगर : पुण्यातील (Pune) हिट अ‍ॅण्ड रन (Hit And Run) प्रकरण ज्वलंत असताना छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथेही अशीच घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मद्यधुंद अवस्थेतील तरुणांनी भरधाव वेगाने कार चालवत भीषण अपघात (Accident) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नसली तरीही इतर गोष्टींचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून मद्यधुंद तरुणांनी घटनास्थळावरुन पळ काढला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री बारा वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर येथे हा अपघात घडला. मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनकडून चारचाकी भरधाव वेगात शिवाजीनगरच्या दिशेने आली. यामध्ये तीन तरुण मद्यधुंद अवस्थेत होते. या तरुणांच्या चारचाकीने रस्त्यावर उभ्या असलेल्या चार दुचाकी, हॉटेल समोर ठेवलेले सहा टेबल, घराचा ओटा, विद्युत खांबाला जोराची धडक देत नुकसान केले. सुदैवाने रात्रीची वेळ असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.


दरम्यान, हा अपघात घडल्यानंतर परिसरात मोठा आवाज झाला. या आवाजामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांची गर्दी पाहताच आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांकडून याबाबत कडक तपास सुरु करण्यात आला आहे.

Comments
Add Comment