Friday, October 4, 2024
Homeताज्या घडामोडीPune MegaBlock : रेल्वेचा मेगाब्लॉक! पुणे-लोणावळा दरम्यान अनेक गाड्या रद्द

Pune MegaBlock : रेल्वेचा मेगाब्लॉक! पुणे-लोणावळा दरम्यान अनेक गाड्या रद्द

पुणे : मध्य रेल्वेने (Central Railway) मुंबईतील तीन दिवसांचा ब्लॉक (Mumbai Megablock) घेतल्यानंतर आता पुण्यातही मेगा ब्लॉक (Pune Megablock) घेतला आहे. पुणे विभागातील पुणे-लोणावळा (Pune-Lonavala) मार्गावरील देखभाल दुरुस्ती कामासाठी मध्य रेल्वेने आज मेगाब्लॉक जारी केला आहे. या ब्लॉक दरम्यान लोकल (Local) रेल्वेसह अनेक मेल एक्सप्रेस (Express) रद्द केल्या जाणार आहेत. त्यामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेने पुणे विभागातील पुणे-लोणावळा मार्गावरील कामशेत- तळेगाव दरम्यान देखभाल दुरुस्ती कामासाठी मेगा ब्लॉक घेतला आहे. या ठिकाणी पुलावर लोखंडी गर्डरच्या ठिकाणी एकूण ६ आरसीसी सेगमेंटल बॉक्स बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे डेक्कन क्विन (Deccan Queen) या एक्स्प्रेससह पुणे-लोणावळा दरम्यान ६ लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच ५ मेल एक्स्प्रेस गाड्यांचे नियमन देखील करण्यात आले आहे.

रद्द असणाऱ्या लोकल

०१५६४ पुणे-लोणावळा
०१५६१ लोणावळा-पुणे
०१५६३ लोणावळा-शिवाजी नगर
⁠०१५६६ पुणे-लोणावळा
०१५८८ शिवाजी नगर-तळेगाव
०१५८९ तळेगाव-पुणे

रद्द होणाऱ्या एक्स्प्रेस

११००७ मुंबई-पुणे डेक्कन
११००८ पुणे-मुंबई डेक्कन
१२१२३ मुंबई-पुणे डेक्कन क्वीन सुपरफास्ट
१२१२४ पुणे-मुंबई डेक्कन क्वीन सुपरफास्ट

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -