Saturday, May 24, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

Post Office Scheme: पोस्ट ऑफिस TD स्कीममध्ये व्याजानेच होणार लाखोंची कमाई!

Post Office Scheme: पोस्ट ऑफिस TD स्कीममध्ये व्याजानेच होणार लाखोंची कमाई!

मुंबई: पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूक करून तुम्ही तगडे रिटर्न्स मिळवू शकता. पोस्ट ऑफिसच्या या स्कीममध्ये गुंतवणूक करून तुम्ही लाखो रूपयांचे व्याज मिळवू शकता. सरकार प्रत्येक वर्गातील लोकांसाठी विविध प्रकारच्या योजना लाँच करत असते. आज आम्ही तुम्हाला अशा जबरदस्त स्कीमबद्दल सांगत आहोत ज्यात गुंतवणूक करून तुम्ही पाच वर्षात जबरदस्त रिटर्न मिळवू शकता.


या स्कीमचे नाव आहे पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट स्कीम. या स्कीमचा कालावधी ५ वर्षांचा आहे.


पोस्ट ऑफिसची ही टाईम डिपॉझिट स्कीम स्मॉल सेव्हिंग स्कीम आहे. यात तुम्ही एकरकमी पैसे टाकू शकता. या पोस्ट ऑफिसची एफडी स्कीमही म्हटले जाते.


या स्कीममध्ये एका वर्षाच्या एफडी स्कीमवर ६.९० टक्के, दोन वर्षांत ७.० टक्के, तीन वर्षात ७.१० टक्के आणि पाच वर्षांच्या एफडी स्कीमवर ७.५० टक्के व्याज मिळते.


या स्कीममध्ये सिंगलसह जॉईंट खातेही खोलता येते. यात कमीत कमी १हजार रूपयांपासून ते अधिकाधिक कितीही गुंतवणूक करता येते.


यात गुंतवणूक केल्यास तुम्हाला इनकम टॅक्सच्या कलम ८०सी अंतर्गत १.५० लाखांची सूट मिळते. पोस्ट ऑफिस कॅलक्युलेटरनुसार या स्कीममध्ये १० लाख रूपयांच्या गुंतवणुकीवर पाच वर्षांमध्ये ४.४९ लाख रूपये व्याज मिळेल.

Comments
Add Comment