Sunday, August 24, 2025

Narendra Modi : कोणत्याही पदावर कुटुंबीय किंवा नातेवाईकांची नियुक्ती करू नका!

Narendra Modi : कोणत्याही पदावर कुटुंबीय किंवा नातेवाईकांची नियुक्ती करू नका!

शपथविधीपूर्वी नरेंद्र मोदींचा नव्या मंत्रिमंडळाला सल्ला

भाजपकडून मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या मंत्र्यांच्या नावांची यादी आली समोर...

नवी दिल्ली : देशात एनडीए (NDA) तिसर्‍यांदा सत्तास्थापन करणार असून आज संध्याकाळी सव्वासात वाजता नव्या मंत्रिमंडळाचा (Cabinet) शपथविधी सोहळा (Oath taking ceremony) पार पडणार आहे. एकूण ६५ खासदार आज मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी आज शपथ घेणार्‍या नव्या मंत्र्यांना नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी चहापानासाठी बोलावले होते. यावेळी मोदींनी त्यांना काही आवश्यक सूचना केल्या. तसेच नव्या मंत्र्यांना मार्गदर्शन केले.

नरेंद्र मोदींनी आजच्या बैठकीत संभाव्य मंत्र्यांना १०० दिवसांच्या अजेंड्यावर काम करण्यास तयार राहण्यास सांगितले आहे. मंत्रिमंडळात सामील झाल्याबद्दल मोदींनी सर्वांचे अभिनंदन केले. तसेच आपल्याला विकसित भारताचा अजेंडा पुढे चालू ठेवण्याची गरज आहे. कोणत्याही व्यत्ययाशिवाय विकासकामे सुरू ठेवायची आहेत, असा सल्ला मोदींनी दिला.

नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

नरेंद्र मोदी म्हणाले, "सर्व खासदार सारखेच आहेत. प्रामाणिकपणावर लक्ष केंद्रित करा. गरीब लोक आणि कामगारांवर विशेष लक्ष द्या. किमान चार दिवस मंत्रालयात काम करा आणि उरलेला वेळ शेतात घालवा. कोणत्याही पदावर कुटुंबीय किंवा नातेवाईकांची नियुक्ती करू नका. असा संदेश देत नरेंद्र मोदींनी भावी मंत्र्यांना राष्ट्रपती भवनात वेळेपूर्वी पोहोचण्यास सांगितले.

नरेंद्र मोदी आज राष्ट्रपती भवनात तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत मंत्र्यांचाही शपथविधी होणार आहे. राज्यातून मुरलीधर मोहोळ, नितीन गडकरी, रामदास आठवले, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव, पियुष गोयल यांची मंत्रीपदी वर्णी लागणार आहे. तर भाजपकडून शपथ घेणाऱ्या इतर मंत्र्यांच्या नावांची यादीही समोर आली आहे.

1.राजनाथ सिंह - उत्तर प्रदेश 2.नितीन गडकरी -महाराष्ट्र 3.अमित शाह - गुजरात 4.निर्मला सीतारामन - तामिळनाडू 5.अश्विनी वैष्णव - ओडिशा 6. पियुष गोयल - महाराष्ट्र 7.मनसुख मांडविया - गुजरात 8.अर्जुन मेघवाल - राजस्थान 9.शिवराज सिंह - मध्य प्रदेश 10.अन्नमलाई - तामिळनाडू 11.सुरेश गोपी - केरळ 12.मनोहर खट्टर - हरियाणा 13.सर्वंदा सोनोवाल - ईशान्य 14.किरेन रिजिजू - ईशान्य 15.राव इंद्रजीत - हरियाणा 16.जितेंद्र सिंग -जम्मू आणि काश्मीर 17. कमलजीत सेहरावत - दिल्ली 18.रक्षा खडसे - महाराष्ट्र 19.जी किशन रेड्डी -तेलंगणा 20.हरदीप पुरी - पंजाब 21. गिरीराज सिंह - बिहार 22.नित्यानंद राय - बिहार 23.बंदी संजय कुमार -तेलंगाणा 24.पंकज चौधरी 25. बीएल वर्मा 26.अन्नपूर्णा देवी 27.रवनीत सिंग बिट्टू - पंजाब 28.शोभा करंदळे - कर्नाटक 29.हर्ष मल्होत्रा ​-​दिल्ली 30.जितिन प्रसाद - यूपी 31.भगीरथ चौधरी राज 32. सीआर पाटील - गुजरात 33.अजय तमटा - उत्तराखंड 34.धर्मेंद्र प्रधान - ओडिशा 35.गजेंद्रसिंह शेखावत -राजस्थान 36. ज्योतिरादित्य सिंधिया - मध्य प्रदेश

Comments
Add Comment