Sunday, June 30, 2024
HomeदेशMonsoon Update: मान्सूनने घेतला वेग, महाराष्ट्रात जोरदार सरी, कोकणात रेड अलर्ट

Monsoon Update: मान्सूनने घेतला वेग, महाराष्ट्रात जोरदार सरी, कोकणात रेड अलर्ट

मुंबई: देशभरात मान्सून(monsoon) वेगाने पुढे सरकत आहे. यामुळे दक्षिण भारत आणि महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. भारतीय हवामान विभागाने आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट आणि पालघर, ठाणे, मुंबई तसेच रायगडसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आयएमडीच्या शक्यतेनुसार या भागांमध्ये वीज चमकण्यासोबतच वेगवान वारे आणि मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. मुंबईच्या आयएमडी कार्यालयाने शनिवारी हे अलर्ट जारी केले.

आयएमडीच्या माहितीनुसार राज्यात रविवारी सकाळी ४ वाजल्यापासून मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांतील विविध स्थानांवर वीज चमकण्यापासून ते मध्यम ते भारी स्वरूपाचा पावसासोबत ४०-५० किमी प्रति तासा वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. आयएमडीने खराब हवामान पाहता लोकांना बाहेर पडताना सावधानता बाळगण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, रविवारी सकाळई मुंबईच्या विविध भागांमध्ये पाऊस झाला.

भारतीय हवामान विभागाने शनिवारी म्हटले होते दक्षिण-पश्चिम मान्सून मध्य अरबी समुद्र, दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणा आणि दक्षिण छत्तीसगड आणि दक्षिण ओडिशाच्या काही भागांमध्ये तसेच किनाऱ्यावर काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -