Friday, June 28, 2024
HomeदेशModi Cabinet: नितीन गडकरी, चिराग पासवान, जयंत चौधरी, अनुप्रिया पटेल...मोदी कॅबिनेटच्या संभाव्य...

Modi Cabinet: नितीन गडकरी, चिराग पासवान, जयंत चौधरी, अनुप्रिया पटेल…मोदी कॅबिनेटच्या संभाव्य मंत्र्यांकडे येऊ लागले फोन

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी मोदी कॅबिनेटमधील संभाव्य मंत्र्यांकडे फोन येऊ लागले आहेत. दरम्यान, आतापर्यंत अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार नितीन गडकरी, जीतन राम मांझी, जयंत चौधरी, चिराग पासवान आणि अनुप्रियया पटेल यांना कॅबिनेट मंत्रीपदासाठी फोन आल्याचे सांगितले जात आहे.

चिराग पासवान यांचा पक्ष LJPRने बिहारमध्ये पाच जागांवर निवडणूक लढवली होती आणि पाचही जागांवर ते यशस्वी ठरले होते. चिराग स्वत: हाजीपूर येथून निवडणूक जिंकले होते. तर नितीन गडकरी पुन्हा एकदा नागपूरमधून निवडणूक जिंकून खासदार झाले आहेत. गडकरी सलग दोन वेळा मोदी कॅबिनेटमध्ये मंत्री राहिलेले आहेत .

तर अनुप्रिया पटेल यांचा अपना दलने दोन जागांवर निवडणूक लढवली होती. यात अनुप्रिया पटेल यांना आपल्या जागेवर विजय मिळाला होता. तर जीतन राम मांझी यांचा पक्ष हिंदुस्तानी आवाम मोर्चा यांच्या खात्यात एनडीएकडून एकच जागा गेली होती. या जागेवर त्यांनी खुद्द निवडणूक लढवली होती आणि तेथून ते जिंकलेही. तर जयंत चौधरी यांच्या पक्षाला दोन जागा मिळाल्या होत्या आणि दोनही जागांवर ते निवडणूक जिंकले.

शपथ घेणाऱ्या खासदारांना भेटणार मोदी

नरेंद्र मोदी शपथ घेणाऱ्या मंत्र्यांसोबत सकाळी ११.३० वाजता चहाची भेट घेणार आहेत. ाया बैठकीत खासदारांना त्यांना दिल्या जाणाऱ्या मंत्रालयाची माहिती दिली जाईल. नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कॅबिनेटमध्ये सहकारी पक्षांची भूमिका महत्त्वाची असणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -