Dombivali Crime : वडिलांच्या मित्रानेच अल्पवयीन मुलीसोबत केले धक्कादायक कृत्य!

  143

आधी जबरदस्तीने मुलीला बिअर पाजली, मग...


डोंबिवली : राज्यभरात गुन्हेगारीच्या (Crime) घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून आता डोंबिवलीमधूनही अत्यंत धक्कादायक घटना (Dombivali Crime) समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीला तिच्या वडिलांच्या मित्रानेच ढाब्यावर नेऊन जबरदस्ती बिअर पाजली आणि तिला निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या कृत्यात त्याच्या आणखी एका नराधम मित्राने त्याला साथ दिली जो सध्या फरार आहे. डोंबिवली पूर्वमधील या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली असून दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष पांडे व त्याचा साथीदार अभिषेक डेरे अशी आरोपींची नावे आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन १४ वर्षांची पिडीत मुलगी व आशिष पांडे हे कल्याण पूर्व परिसरात राहतात. त्यात आशिष पांडे हा वडिलांचा मित्र असल्याने सदर मुलगी त्याला ओळखत होती. गुरुवारी शाळेला सुट्टी असल्याने ही मुलगी तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली होती. याच संधीचा फायदा घेत आशिषने तिला तिच्या वडिलांनी घरी बोलावले असल्याचे सांगून मैत्रिणीच्या घराबाहेर बोलावले व तिला आपल्या दुचाकीवरुन घेऊन निघाला. रस्त्यात त्याने साथीदार अभिषेक डेरेलाही आपल्या सोबत घेतले.


आशिष या दोघांना नांदिवली भागातील एका ढाब्यावर घेऊन गेला. तेथे आशिषने जबरदस्तीने पीडित मुलीला बिअर पाजली. बिअर प्यायली नाही तर तुझ्या कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी मुलीला दिली. बिअर पाजल्यामुळे पुढे काय झाले हे मुलीला समजले नाही. आशिषने नंतर तिला एका निर्जन स्थळी असलेल्या इमारतीत नेत तिच्यावर लैगिंक अत्याचार केला.


दुपारी घराबाहेर गेलेली मुलगी संध्याकाळ झाली तरी घरी आली नाही म्हणून पालकांनी तिचा शोध सुरू केला. तिच्या मैत्रिणीला विचारणा करण्यात आली. त्यावेळी तिने ती आशिषसोबत गेली असल्याचे सांगितले. त्यानंतर रात्रीच्या वेळेत पीडित ती राहत असलेल्या घराच्या परिसरात गुंगीत असल्याचे कुटुंबीयांना दिसले.


दुसऱ्या दिवशी तिला विश्वासात घेऊन पालकांनी तिला घडल्या प्रकाराविषयी विचारले. त्यावेळी आशिष पांडेने आपले अपहरण करून आपणास जबरदस्तीने बिअर पाजून लैंगिक अत्याचार केला आहे, असे तिने कुटुंबीयांना सांगितले. या प्रकाराने हादरलेल्या पालकांनी तातडीने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन आशीष पांडे, अभिषेक डेरे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. आशिष याला तात्काळ अटक करण्यात आली आहे. तर डेरे हा अद्याप फरार आहे.

Comments
Add Comment

रत्नागिरी : पोटच्या मुलाकडून आईचा सुरीने गळा कापून खून

रत्नागिरी : पोटच्या मुलानेच आपल्या आईचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आज (दि. २६ ऑगस्ट) पहाटे उघडकीस आली. या

Ganeshostav 2025: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांची गर्दी

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील चाकरमानी मोठ्या प्रमाणावर गावात दाखल झाले आहेत. त्यामुळे

पुण्यात मानाच्या गणपतींच्या मिरवणुकांची जय्यत तयारी : प्राणप्रतिष्ठा आणि मिरवणुकांचे वेळापत्रक जाहीर

पुणे : लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी आता फक्त काही तास उरले आहेत. बुधवारी देशभरात गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात

मुंबईत आंदोलन करण्यास मनोज जरांगे पाटील यांना न्यायालयाची मनाई

मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान येथे उपोषण करण्यास हायकोर्टाने मनाई केली आहे. मराठा

मुख्यमंत्री फडणवीसांच्या ओएसडीने घेतली मनोज जरांगेंची भेट, मोर्चाची तारीख पुढे ढकलण्याची शक्यता

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी राज्य

बीडमध्ये लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेक, विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते भिडले

बीड : गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार