Tuesday, October 8, 2024
Homeक्राईमPhone Hack : सावधान! 'या' युजर्सचा कधीही होईल फोन हॅक

Phone Hack : सावधान! ‘या’ युजर्सचा कधीही होईल फोन हॅक

सरकारने दिली धोक्याची घंटा

मुंबई : अ‍ॅण्ड्रॉइड (Android) फोन वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने अलीकडेच एक इशारा दिला आहे. स्मार्टफोन हॅकिंग आणि ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना अशातच अॅण्ड्रॉइड फोन युजर्ससाठी सरकारने दिली धोक्याची घंटा दिली आहे.

CERT-In ने दिलेल्या माहितीनुसार, Android OS मध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत. या त्रुटींमुळे, जर कोणत्याही हॅकरला तुमचा फोन हॅक (Phone Hack) करायचा असल्यास त्याच्यासाठी ते खूप सोपे होणार आहे. त्रुटींचा वापर करून हॅकर्स तुमच्या फोनमधून तुमची महत्त्वाची माहिती आणि डेटा काढू शकतात. या प्रकरणामध्ये Android 12, Android 12L, Android 13 आणि Android 14 चा समावेश आहे. त्यामुळे CERT-In ने युजर्सना लवकरात लवकर सिक्युरिटी पॅच अपडेट करण्यास सांगितले आहे.

असा करा तुमचा फोन अपडेट

  • सर्वात आधी तुमच्या फोनची Setting ओपन करा.
  • त्यात सॉफ्टवेअर अपडेट्स शोधा आणि ते उघडा.
  • यानंतर Check for Updates वर क्लिक करा.
  • जर ‘Update available’ म्हणजे अपडेट उपलब्ध असेल तर ते डाउनलोड करा.
  • अपडेट डाउनलोड केल्यानंतर ते इन्स्टॉल करा.
  • इन्स्टॉल केल्यानंतर फोन रीस्टार्ट करा.
  • यानंतर तुमचा फोन पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -