Amrita Rao : अमृता राव करणार मोठ्या पडद्यावर कमबॅक!

'या' चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला...


मुंबई : अमृता राव (Amrita Rao) ही बॉलिवूडमध्ये (Bollywood) मोजकेच चित्रपट केलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा शाहिद कपूरसोबतचा (Shahid Kapoor) विवाह चित्रपट फार गाजला. त्यानंतर ती जॉली एलएलबी सिनेमात अर्शद वारसीच्या (Arshad Warsi) गर्लफ्रेंडच्या भूमिकेत दिसली होती. सिनेसृष्टीत जास्त न दिसलेली ही अभिनेत्री पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कमबॅक करण्यास सज्ज झाली आहे. हा चित्रपट म्हणजेच जॉली एलएलबीचाच तिसरा भाग असणार आहे. यात अमृता राव अर्शद वारसीच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.


सुभाष कपूर दिग्दर्शित 'जॉली एलएलबी ३' (Jolly LLB 3) या चित्रपटाचे सध्या शूटिंग सुरु आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागात अर्शद वारसी मुख्य भूमिकेत दिसला होता, तर दुसर्‍या भागात अक्षय कुमार (Akshay Kumar) मुख्य भूमिकेत होता. त्याच्या पत्नीची भूमिका हुमा कुरैशीने साकारली होती. पहिल्या दोन्ही भागांमध्ये सौरभ शुक्ला यांनी मुख्य न्यायाधीशाची भूमिका साकारली होती. विशेष बाब म्हणजे सिनेमाच्या तिसर्‍या भागात अर्शद वारसी व अक्षय कुमार हे दोन्ही अभिनेते एकत्र दिसणार आहेत. तर अर्शदच्या पत्नीची भूमिका अमृता राव करणार आहे.


'जॉली एलएलबी'च्या तिसऱ्या भागाचं काही शुटींग राजस्थानमध्ये झालं आहे. हे शूटिंग राजस्थानमधील अत्यंत दुर्गम भागात झाले आहे. त्या ठिकाणच्या रस्त्यावरून एकही वाहन जाऊ शकत नसल्यामुळे तेथे जाण्यासाठी प्रत्येकाला चालत जावे लागत होते. आता शूटिंग मुंबईत होत आहे. यानंतर काही सीन दिल्लीत शूट होणार आहेत. परंतु अद्याप अमृताकडून या चित्रपटातील तिच्या भूमिकेबाबत कोणत्याही प्रकारचं भाष्य करण्यात आलेलं नाही.


Comments
Add Comment

Viral 'brother-sister' : ३५ हजार फूट उंचीवरही राखीचं नातं; एअर इंडियाचे भाऊ-बहिण बनले सहकारी, कहाणी होतेय व्हायरल

नवी दिल्ली: रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचे औचित्य साधून एअर इंडियाने मणिपूरमधील एका होतकरू भाऊ-बहिणीची

Punjab : महागाई भत्त्यासाठी पंजाबमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन; सचिवालयाचे कामकाज ठप्प

चंदीगड : अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या महागाई भत्त्याच्या (DA) मागणीसाठी पंजाबमधील सरकारी कर्मचाऱ्यांनी

Karnataka teachers suspended : RSS च्या पथसंचालनात सहभाग घेणं पडलं महाग! कर्नाटकातील २ सरकारी शिक्षकांवर निलंबनाची मोठी कारवाई

कर्नाटक : कर्नाटकच्या यादगीर जिल्ह्यात शिक्षण विभागाने दोन सरकारी शिक्षकांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली

Raksha Bandhan : राष्ट्रपतींसह अन्य नेत्यांनी देशवासीयांना रक्षाबंधन सणाच्या दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह

PMJDY :'प्रधानमंत्री जन धन योजने'ला 12 वर्षे पूर्ण, 59.09 कोटी खाती उघडली, 3.17 लाख कोटी रुपये जमा

56% खातेधारक महिला आहेत तर 78% खाती ग्रामीण व निम-शहरी भागांमधील आहेत देशभरात डिजिटल पेमेंट आणि आर्थिक

USA Murder Case : अमेरिकेत प्रेयसीची हत्या केली, भारतात ठिकाना लावला...अन् आरोपीला आग्र्यातून अटक!

अमेरिकेत आपल्या प्रेयसीची भयंकर हत्या करून भारतात पळून आलेल्या एका आरोपीला आग्रा येथून पोलिसांनी अटक केली आहे.