Friday, March 21, 2025
Homeताज्या घडामोडीBelgaon news : बेळगावच्या घटप्रभा नदीत १३ जणांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली उलटली!

Belgaon news : बेळगावच्या घटप्रभा नदीत १३ जणांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली उलटली!

१२ जण बचावले तर एकजण वाहून गेला

बेळगाव : गेल्या काही दिवसांत बुडण्याच्या घटनांमध्ये (Drowning) प्रचंड वाढ झाली आहे. त्यातच आता बेळगावमधूनही (Belgaon) एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. बेळगावच्या घटप्रभा नदीत (Ghatprabha River) १३ प्रवाशांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली (Tractor Trolley) उलटल्याची घटना घडली आहे. यापैकी बारा जण बचावले असून एक जण पाण्यातून वाहून गेला. त्याचा शोध सुरु आहे. कुलगोड पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली.

बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील आवरादी गावाजवळ १३ जणांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली घटप्रभा नदीत उलटली. ट्रॅक्टरमधील प्रवासी आवरादी येथून नांदगाव येथे मजुरीसाठी निघाले होते. घटप्रभा नदी ओलांडून दररोज हे मजूर कामावर जात. मात्र, आज ही दुर्घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरु करण्यात आलं. या दुर्घटनेतील १२ जण बचावल्याची माहिती असून एक जण अद्यापही बेपत्ता आहे. पोलिसांनी नदीत वाहून गेलेल्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. प्रशासन बचावकार्यात गुंतलेलं आहे. कुलगोड पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

बेळगावमध्ये जोरदार पावसाची हजेरी

दरम्यान, बेळगावमध्ये जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. बेळगावात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसामुळे अनेक भागात, घरात आणि दुकानात पाणी शिरले. बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथे गुरुवारी रात्री ढगफुटी होऊन पाऊस झाल्याने श्री यल्लमा देवीच्या मंदिरात देखील पाणी शिरले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -