Tuesday, October 21, 2025
Happy Diwali

Weather Update : वीकेंडला कोसळणार पावसाच्या धारा!

Weather Update : वीकेंडला कोसळणार पावसाच्या धारा!

'या' भागात हवामान विभागाकडून यलो अलर्ट

मुंबई : दुपारच्या वेळी जाणवणारा प्रचंड उकाडा आणि वातावरणातील एकंदर स्थिती पाहता मान्सून (Monsoon) महाराष्ट्रात दाखल झाला आहे. तर मान्सूनने बहुतांश जिल्हे व्यापण्यास सुरुवात केली आहे. काल महाराष्ट्रात काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. अशातच वीकेंडला काही भागात वादळी पावसासह हवामान विभागाने (IMD)यलो अलर्ट दिला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, आतापर्यंत या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगलीसह कोल्हापूर या भागांपर्यंत मजल मारली आहे. त्यानुसार आज विदर्भासह उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यावेळी ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सिंधुदुर्गात वादळी वाऱ्यांचा इशारा

हवामान विभागाचा अंदाज पाहता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मस्त्य व्यवसायिकांना महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार, ११ जून दरम्यान समुद्रात ३५ ते ४५ किलोमीटर प्रतितास वेगाने वार वाहणार असून हा वेग ५५ किमीपर्यंतही पोहोचू शकतो. त्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असा इशारा दिला आहे.

Comments
Add Comment