Saturday, June 29, 2024
Homeब्रेकिंग न्यूजShinde Vs Thackeray : मुख्यमंत्री शिंदेंचे शिलेदार ठाकरेंचे नवनिर्वाचित खासदारही फोडणार?

Shinde Vs Thackeray : मुख्यमंत्री शिंदेंचे शिलेदार ठाकरेंचे नवनिर्वाचित खासदारही फोडणार?

नरेश म्हस्के यांच्या दाव्याने ठाकरे गटाच्या गोटात उडाली खळबळ

मुल्ला-मौलवींना पैसे देऊन मतं मिळवण्याची उद्धव ठाकरेंची भूमिका न पटल्याने ‘हे’ दोन खासदार शिंदेंना साथ देणार

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने (Shivsena) यंदाच्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election)१५ जागा लढवल्या होत्या, त्यांपैकी ७ जागांवर शिंदेंचे खासदार निवडून आलेत. तर, उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) उबाठाने महाराष्ट्रात २१ जागा लढवलेल्या त्यापैकी ९ जागांवर त्यांना विजय मिळाला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला यंदा जास्त जागा मिळाल्या त्यामुळे मविआ जोमात आहे. मात्र, त्याच दरम्यान शिवसेनेचे ठाण्यातील नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी केलेल्या एका दाव्यामुळे ठाकरेंच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाचे दोन खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडानंतर अनेक ठाकरे गटाचे अनेक मोठमोठे नेते आपल्या बाजूने वळवले. बड्या नेत्यांनी साथ सोडल्याने ठाकरे गट खिळखिळा झाला. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मात्र अनेकांची घरवापसी होणार की काय, असं चित्र निर्माण झालं होतं. मात्र, आता शिंदेंची शिवसेना ठाकरेंच्या खासदारांनाही आपल्यासोबत घेणार असल्याच्या चर्चा म्हस्के यांनी केलेल्या दाव्यामुळे सुरु झाल्या आहेत.

काय म्हणाले नरेश म्हस्के?

ठाकरे गटाच्या दोन खासदारांनी आमच्याशी संपर्क साधला. आपल्या मतदारसंघात विकासकामे झाली पाहिजेत, अशी त्यांची इच्छा आहे. यासाठी या दोन्ही खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतो, असे सांगितले आहे. मुल्ला-मौलवींना पैसे देऊन मतं मिळवण्याची उद्धव ठाकरेंची भूमिका आम्हाला पटलेली नाही, असे या खासदारांनी आम्हाला सांगितले. मात्र, पक्षांतर केल्यास अपात्रतेची कारवाई होऊ शकते. पक्षांतरबंदी कायद्यातंर्गत कारवाईचा धोका टाळण्यासाठी या दोन खासदारांनी प्लॅनही आखला आहे. आम्ही सहा खासदारांची संख्या जमवतो आणि लवकरात लवकर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली मोदी साहेबांना पाठिंबा देऊ, असे या दोन खासदारांचे म्हणणे असल्याचा दावा नरेश म्हस्के यांनी केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -