Tuesday, April 22, 2025
HomeदेशNarendra Modi : नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा; निमंत्रण पत्रिका आली समोर

Narendra Modi : नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा; निमंत्रण पत्रिका आली समोर

दोन दिवस दिल्लीत नो फ्लायझोन; ‘अशी’ असेल त्रिस्तरीय सुरक्षा

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी (Narendra Modi) उद्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी राष्ट्रपती भवनात हा सोहळा पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याची (Oath ceremony) निमंत्रण पत्रिका समोर आली असून या पार्श्वभूमीवर दिल्लीत (Delhi) मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. राजधानी दिल्ली हाय अलर्टवर ठेवली असून जमिनीपासून आकाशापर्यंत कडक सुरक्षा करण्यात आली आहे.

नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान पदाची निमंत्रण पत्रिका समोर आली आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे राष्ट्रपती डॉ मोहम्मद मुइज्जू, सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफीक, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मॉरीशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनुथ, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल, भूतानचे पंतप्रधान शेरिंग टोबगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

दोन दिवस दिल्लीत नो फ्लाइंग झोन

नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी देशाची राजधानी दिल्लीला रविवारपासून पुढील दोन दिवस नो फ्लाइंग झोन घोषित केला आहे. या कालावधीत पॅराग्लायडर्स, पॅरा मोटर, हँग ग्लायडर, यूएव्ही, यूएएस, हॉट एअर बलून, मायक्रोलाइट एअरक्राफ्ट आणि रिमोट ऑपरेटेड एअरक्राफ्टच्या उड्‌डाणावर बंदी घातली आहे.

सुरक्षेसाठी एसपीजी. राष्ट्रपती सुरक्षा रक्षक, आयटीबीपी, दिल्ली पोलीस, गुप्तचर विभागाचे पथक निमलष्करी दल, एनएसजी ब्लॅक कॅट कमांडो आणि एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले आहे. सुरक्षा क्षेत्रात कोणतेही अनधिकृत वाहन येऊ नये यासाठीही सखोल तपासणी करण्यात येत आहे.

‘अशी’ असेल त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था

  • आतील स्तर राष्ट्रपती भवन आणि कर्तव्य पथ भोवती उच्च सुरक्षा क्षेत्र असेल, येथे शपथविधी होणार आहे.
  • बाहेरील स्तर – परदेशी राष्ट्रपमुख आणि प्रतिष्ठित व्यक्ती राहणार असलेली हॉटेल्सभोवती सुरक्षिततेचा दुसरा स्तर असेल. यामध्ये लाल, मौर्य, लीला आणि ओबेरॉय हॉटेल्सचा समावेश आहे
  • सर्वात बाहेरील सुरक्षा – मध्य दिल्लीच्या आसपास सुरक्षेचा तिसरा स्तर असेल. यामध्ये जमिनीपासून आकाशापर्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -