Friday, June 13, 2025

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग बंद होण्याची शक्यता

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग बंद होण्याची शक्यता

संगमेश्वरच्या धामणीत रस्ता खचला


संगमेश्वर : मुंबई गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) संगमेश्वरमधील धामणी येथे संरक्षक भिंतीचे काम अर्धवट स्थितीत राहिल्याने पावसामुळे रस्ता खचण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे धामणी येथील रेल्वे ब्रीजच्या जवळ महामार्गावरील वाहतूक आता धोकादायक बनली आहे. आता प्रशासनाने याची वेळीच दखल घेतली नाही तर मुंबई गोवा महामार्ग बंद होण्याची शक्यता आहे.


गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस पडतोय. अशा स्थितीत पहिल्याच पावसात मुंबई गोवा महामार्गावरील ही परिस्थिती समोर आली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मार्गावरील संगमेश्वरजवळील संरक्षक भिंतीचे आणि रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. त्याचा फटका आता नुकत्याच झालेल्या पावसात बसल्याचे दिसून आले. या ठिकाणचा रस्ता आता खचताना दिसत आहे.


डिझेल तुटवडा असल्याने काम बंद असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे आता ऐन पावसाळ्यात रस्ता खचल्यास महामार्गावरील वाहतूक बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


अशीच परिस्थिती कायम राहिली तर या महामार्गावरील वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे खचणाऱ्या रस्त्याला कुठेही पर्यायी मार्ग नाही. येत्या चार दिवसात कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यातच हा भराव अधिक खचत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे ऐन पावसाच्या सुरुवातीला मुंबई गोवा महामार्ग बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >