Thursday, July 4, 2024
Homeब्रेकिंग न्यूजDevendra Fadnavis : मी पळणारा नाही तर लढणारा व्यक्ती!

Devendra Fadnavis : मी पळणारा नाही तर लढणारा व्यक्ती!

एक मिनीट देखील शांत बसलो नव्हतो आणि बसणार नाही आहे

मोकळं करण्याच्या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : राज्यात महायुतीला (Mahayuti) आलेल्या अपयशाची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकारमधून मला मोकळं करावं, अशी विनंती पक्षश्रेष्ठींकडे केली होती. याबाबत त्यांनी निकालाच्या दुसर्‍याच दिवशी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. त्यांच्या उपमुख्यमंत्री व गृहमंत्रीपदाच्या राजीनाम्याच्या मागणीला अमित शाह (Amit Shah) यांनी मात्र स्पष्ट नकार दिल्याचे व त्यांना काम सुरु ठेवण्याचा सल्ला दिल्याचे माध्यमांतून समोर आले. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः माध्यमांशी संवाद साधत नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे. मुंबईत भाजपची बैठक पार पडली, यावेळी त्यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत राजकीय गणितात आपण कमी पडलो. मी मोकळं करा, हे निराशेतून बोललो नाही. देवेंद्र फडणवीस हा पळणारा व्यक्ती नाही. लढणारा व्यक्ती आहे. चारी बाजूंनी घेरल्यानंतर पुरंदरचा तह करणारे आणि पुन्हा ताकदीने सर्व किल्ले जिंकणारे शिवराय आमची प्रेरणा आहेत. कोणाला वाटलं असेल की मी निराश झालो किंवा भावनेच्या भरात बोललो, तर ते सत्य नाही. माझ्या डोक्यात स्ट्रॅटेजी होती. मी अमित शाह यांना भेटून आलो, त्यांना काय डोक्यात आहे ते सांगितलं. त्यांनी मला सांगितलं आपण महाराष्ट्राची ब्लू प्रिंट तयार करु. मी एक मिनीट देखील शांत बसलो नव्हतो आणि बसणार नाही आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नेहरुंनंतर तिसर्‍यांदा पंतप्रधान बनण्याचा विक्रम मोदींचा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशाच्या इतिहासामध्ये सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचे रेकॉर्ड यापूर्वी केवळ नेहरुंच्या नावावर आहे. त्यांची बरोबरी आता नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केली आहे. लोकांनी मोदीजी आणि एनडीएवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला. आपल्याला रणनिती ठरवण्यासाठी आजची बैठक महत्वाची आहे. महायुतीचं सरकार पुन्हा कसं आणता येईल, यासाठी प्रयत्न करुयात, असं आवाहन फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केलं.

पाऊस पडताना जे पेरलं जातं ते उगवतं

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, जसा आनंद आहे, तशीच मनात सल आहे. २०१४ आणि २०१९ ला आपण जो सिंहाचा वाटा उचलला होता तो आता आपण उचलला नाही. आता आपल्याला पुन्हा एकदा रणनीती ठरवता यावी यासाठी आजची बैठक आहे. पराभवाची कारणे शोधून ती कशी दूर करता येईल यासाठी आज निर्धार केला. उन्हाळा संपत आहे काहीली पण संपत आहे. पावसाळा जवळ आला आहे. पाऊस पडताना जे पेरलं जातं ते उगवतं. आपण नव्याने पेरण्याची वेळ आलेली आहे, असं फडणवीस म्हणाले.

मला मोकळं करुन काम करायची संधी द्या

भाजपचे नेतृत्व मी करत असल्याने मी म्हटले की या अपयशाची जबाबदारी माझी आहे. मी दोन्ही अध्यक्ष यांचे आभार मानतो. अर्थ मॅटिकमध्ये आपण कमी पडलो. मी म्हणालो की मला काम करण्याची संधी द्या. या निवडणुकीमध्ये भाजपचे नेतृत्व मी करत असल्यामुळे अपयशाची जबाबदारी माझ्यावर आहे. राजकीय गणितात आम्ही कमी पडलो. मी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करेन. सर्वांनी अतिशय चांगलं काम केलं. मला मोकळं करुन काम करायची संधी द्या, असंही देवेंद्र फडणीस म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -