Thursday, April 24, 2025
Homeताज्या घडामोडीCM Eknath Shinde : मिटनेवाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक...

CM Eknath Shinde : मिटनेवाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे!

नरेंद्र मोदींना समर्थन देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ऐकवला शेर

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर (Loksabha Election Results) एनडीएच्या (NDA) ज्या बैठका पार पडल्या, त्यातून देशात पुन्हा एकदा एनडीएचेच सरकार स्थापन होणार यावर शिक्कामोर्तब झाले. यानंतर आज दिल्लीतील जुन्या संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांची तसेच घटक पक्षांच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची एकमताने एनडीएच्या नेतेपदी निवड करण्यात आली असून नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीची वेळ आणि तारीखही ठरली आहे. रविवारी ९ जूनला संध्याकाळी ६ वाजता हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

दरम्यान, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतेपदी निवडीचा प्रस्ताव ठेवला, त्यावर गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, चंद्राबाबू नायडू, कुमारस्वामी, नितीश कुमार यांनी अनुमोदन दिलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनीही नरेंद्र मोदी यांना समर्थन देत भाषण केलं. राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्या मागणीला आमच्या पक्षाकडून समर्थन देत असल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलं. अनेकांनी देशाच्या जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण, अफवा पसरवणाऱ्यांना जनतेने नाकारलं आणि मोदी यांना स्वीकारलं आहे, असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं. या भाषणावेळी त्यांनी एक शेर ऐकवला ज्याला उपस्थितांनीही भरभरुन दाद दिली.

एकनाथ शिंदे म्हणाले,
मैं उस माटी का वृक्ष नहीं
जिसको नदीयों ने सीचा हैं,
बंजर माटी मैं पलकर मैने मृत्यू से जीवन खींचा हैं
मैं पत्थर पर लिखी इमारत हूं, शिसे से कबतक तोडोगे
मिटनेवाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे
अशी शेरोशायरी मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी ऐकवली.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

मुख्यमंत्री म्हणाले, शिवसेना-भाजपची युती हा फेविकॉल का जोड आहे, तो कधीही तुटणार नाही. नरेंद्र मोदींनी केलेलं काम देशाने पाहिलं आहे. आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे. कारण आज नरेंद्र मोदी यांची एनडीएचे नेते म्हणून निवड करण्यात येत आहे. गेल्या दहा वर्षात मोदी यांनी या देशाचा विकास केला. या देशाला पुढे नेले. या देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली. या देशाला नवी ओळख देण्याचे काम केले. मी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदासाठी शुभेच्छा देतो, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -