Tuesday, May 13, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

T-20 world cup 2024: अरेरे! नवख्या USAकडून पाकिस्तानचा पराभव, सुपर ओव्हरपर्यंत रंगला थरार

T-20 world cup 2024: अरेरे! नवख्या USAकडून पाकिस्तानचा पराभव, सुपर ओव्हरपर्यंत रंगला थरार

मुंबई: पाकिस्तान आणि यूएसए यांच्यातील सामना शेवटच्या बॉलवर बरोबरीत सुटला होता. मात्र सुपर ओव्हरमध्ये यूएसएने पाकिस्तानला हरवत इतिहास रचला. सुपर ओव्हरमध्ये मोहम्मद आमिरचे सातत्याने वाईड टाकणे पाकिस्तानच्या पराभवाचे मुख्य कारण ठरले . तर सौरभ नेत्रावलकर सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी करत यूएसएच्या विजयाचा हिरो ठरला.


अमेरिकेसाठी कर्णधार मोनांक पटेलने ५० धावा आणि आरोन जोन्सने ३५ धावांची खेळी केली. अँड्रीज गौसनेही २६ बॉलमध्ये ताबडतोब ३५ धावा तडकावल्या. पाकिस्तानने पहिल्यांदा खेळताना २० षटकांत १५९ धावा केल्या होत्या. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने ४४ धावा तर शादाब खानने ३० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. यातच यूएसएच्या नोशतुश केंजिगेने ३ विकेट घेताना चांगली कामगिरी केली.


यजमान यूएसए जेव्हा आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरली तेव्हा मोनांकच्या खेळीने सगळे प्रभावित झाले. अखेरीस यूएसएचा डाव १५९ धावांवर संपला.



सुपर ओव्हरचा खेळ


यूएसएचा डाव


सुपर ओव्हरमध्ये यूएसएने पहिल्यांदा फलंदाजी केली. आरोन जोन्सने मोहम्मद आमिरच्या पहिल्या बॉलवर चौकार ठोकला. दुसऱ्या बॉलवर २ धावा आल्या. जोन्सने तिसऱ्या बॉलवर एकेरी धाव घेतली. चौथा बॉल आमिरला परत टाकावा लागला कारण तो वाईड ठरला. यावर दोन बॉलवर दोन धावा आल्या. आमिरने पुन्हा तीच चूक करताना पुन्हा वाईड टाकला. यावर यूएसएच्या फलंदाजांनी धावून २ धावा घेतल्या. तर शेवटच्या ओव्हरमध्ये एक रन घेताना यूएसएने १८ धावा केल्या.



पाकिस्तानचा डाव


नेत्रावलकरने पहिला बॉल डॉट टाकला. मात्र दुसऱ्या बॉलवर इफ्तिखार अहमदने चौकार ठोकला. तर पुढला बॉल वाईड ठरला. मात्र तिसऱ्या बॉलवर इफ्तिखार कॅच आऊट झाला. नेत्रावलकरने चौथा बॉल वाईड टाकला. मात्र त्याच्याच पुढच्या बॉलवर लेग बाय चौकार मिळाला. ५व्या बॉलवर २ धावा आल्या. शेवटच्या बॉलवर एक धाव घेतली. अशा पद्धतीने यूएसएने सामना जिंकला.

Comments
Add Comment