मुंबई: मीठाशिवाय अन्नाला चव येत नाही. मीठ घातल्याने अन्नाला खरी चव मिळते. अशातच तुम्हाला माहीत आहे का की जगातील सर्वाधिक मीठाचे उत्पादन कोणत्या देशात होते.
मीठ आपल्या शरीरासाठी तसेच खाण्यासाठी गरजेचे आहे. याचा वापर जगभरातील प्रत्येक देशात होतोय. अशातच तुम्हाला हे माहीत आहे का की कोणत्या देशातच मीठाचे उत्पादन सर्वाधिक होते. तसेच भारत या उत्पादनात कितव्या स्थानावर आहे.
मीठाचे उत्पादन करणाऱ्या देशांच्या यादीत पहिल्या स्थानावर चीनचे नाव येते. चीनमध्ये एका वर्षाला ५३ मिलियन टन मीठाचे उत्पादन केले जाते.
या यादीत दुसऱ्या स्थानावर अमेरिकेचे नाव येते. अमेरिकेत दरवर्षी ४२ मिलियन टन मीठाचे उत्पादन होते.
तर आपल्या भारत देशाचा मीठाच्या उत्पादनात तिसरा क्रमांक लागतो. आपल्या देशात तर वर्षी ३० मिलियन टन मीठाचे उत्पादन होते.
या यादीत चौथ्या स्थानावर जर्मनीचे नाव आहे जे वर्षभरात १५ मिलियन टन मीठाचे उत्पादन करतात.
तर पाचव्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचे नाव येते. ते दरवर्षी १४ मिलियन टन मीठाचे उत्पादन करतात.