Monday, April 21, 2025
Homeताज्या घडामोडीRussian River : रशियामध्ये शिकणाऱ्या महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा रशियाच्या नदीत बुडून मृत्यू!

Russian River : रशियामध्ये शिकणाऱ्या महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा रशियाच्या नदीत बुडून मृत्यू!

व्हिडीओ कॉलवर आई म्हणाली, ‘बाळांनो पाण्यात जाऊ नका, अन्…

अमळनेर : काही दिवसांपूर्वी बोट उलटल्याने अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घडना सातत्याने घडत होत्या. अशातच अमळनेर शहरातील विद्यार्थ्यांबाबत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रशियात शिकणारे अमळनेरचे तीन विद्यार्थी फिरायला गेले असता तिघांचा रशिया नदीत (Russian River) बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रशियातील दुतावासमधील कुमार गौरव (आयएफएस) यांनी घटनेची माहिती दिली आहे. तर या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नुसार हर्षल अनंतराव देसले (भडगाव), झिशान अश्पाक पिंजारी, जिया फिरोज पिंजारी (अमळनेर) येथील विद्यार्थी रशियाच्या यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये (NovSU) वैद्यकीय शिक्षण घेत होते. हे तिघे आणि त्यांचे सहकारी विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाच्या मोकळ्या वेळेत संध्याकाळी वोल्खोव्ह नदीच्या किनारी फेरफटका मारत होते. त्यावेळी ही अनपेक्षित घटना घडली आहे.

दरम्यान, जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रशिया येथील दुतावासातील कुमार गौरव (आयएफएस) यांच्याशी संपर्क करून सर्व माहिती जाणून घेतली. त्यानुसार निवासी जिल्हाधिकारी सोपान कासार यांनी पालकांना तिथल्या प्रशासनाशी संपर्क करुन दिला आहे. सध्या रशियन फेडरेशनमधील सर्व संबंधित एजन्सीं पुढील कार्यवाही करत आहेत.

नेमके घडले काय?

अश्पाक पिंजारी यांचा मुलगा जिशान आणि बहिणीची मुलगी जिया या दोघांना गेल्या वर्षी जुलैमध्ये एमबीबीएसच्या शिक्षणासाठी रशियाला वेलिकी नोवगोरोद शहरात रवाना केले होते. अभ्यासानंतर रिकाम्या वेळेत हे दोघे मित्रासह वोल्खोव्ह नदीच्या काठावरील पेडिस्टन पुलाजवळील चौपाटीवर फिरायला गेले होते.

नेहमीप्रमाणे जिशान याने आपल्या आईला व्हिडिओ कॉल केला. त्यावेळी जिया नदीत गुडघाभर पाण्यात उतरली आहे, हे आनंदाने तो आपल्या आईला दाखवत होता. मात्र त्याच्या आईने त्याला पाण्यात नको जाऊ आणि जियाला देखील बाहेर यायला सांग, असे म्हटले. मात्र अवघ्या १५ मिनिटांत नदीला पूर आला अन् क्षणात पाण्यात उतरलेले विद्यार्थी वाहू लागले. उपस्थितांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यात एकीला वाचवण्यात यशही आले. परंतु जिशान आणि जिया यांचा थांगपत्ता लागला नाही. नातेवाईकांना ही घटना कळवताच कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -